
महालगाव/वैजापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) : राष्ट्रीय विचारांना पराजित करण्यासाठी गत लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रात ‘व्होट जिहाद’ची व्यवस्था उभी करण्यात आली होती. राष्ट्रीय विचारांच्या विरोधात काही मूठभर लोक एकत्र येत असल्याचे षड्यंत्र लक्षात आल्यावर राज्यातील आध्यात्मिक शक्तींना आवाहन केले.