मुख्यमंत्री शिंदे जाताच शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडून केलं रस्त्याचं शुध्दीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Eknath Shinde

मुख्यमंत्री शिंदे जाताच शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडून केलं रस्त्याचं शुध्दीकरण

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत, मुख्यमंत्र्यांचा आजचा दौरा सुरू होण्याआधीच चर्चेत आला आहे तो पैसे देऊन लोक बोलावणं, गर्दी करण्यासाठी विशेष आदेश काढणं, अशा अनेक गोष्टीसांठी. यादौऱ्यादरम्यान एकनाथ शिंदे यांची पेढेतुला तर संदिपान भुमरे यांचीही लाडूतुला देखील करण्यात आली. दरम्यान मुख्यमंत्री शिंदे हे दौऱ्यासाठी आज ज्या रस्त्याने गेले त्या रस्त्यावर शिवसेनेकडून गोमूत्र शिंपडून त्याचे शुद्धीकरण करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री ज्या रस्त्याने गेले तो रस्ता शुद्ध व्हावा म्हणून शिवसेनेकडून त्यावर गौमूत्र शिंपडून त्या रस्त्याचं शुध्दीकरण करत अनोखे आंदोलन करण्यात आले. औरंगाबादमधील बिडकीन येथे हा प्रकार घडला. यावेळी शिंदे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले. दोन्हीकडून यावेळी एकमेकांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

हेही वाचा: Raj Thackeray : सूचक विधानामुळे चर्चांना पुन्हा उधाण; म्हणाले, 'सध्या...'

मंत्री संदीपान भुमरे यांच्या पैठण विधानसभेत मुख्यमंत्री सभेसाठी आले होते, दुपारी विमानतळावर आल्यानंतर त्यांचा ताफा बिडकीन मार्गे पैठणकडे निघाला, यावेळी मुख्यमंत्र्यांचे जागोजागी स्वागत करण्यात आले. तसेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ताफा निघून गेल्यानंतर रस्त्याचे गौमूत्र शिंपडून रस्त्याचे शुध्दीकरण करण्यात आले.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सत्तापालट झाल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटात सत्तासंघर्ष न्यायालयात सुरू आहे. या बंडखोरांच्या विरोधात राज्यातील शिवसैनिकांमधून अजूनही सतत असंतोष व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा: सामंतांना जाळून टाकू म्हणणाऱ्या कार्यकर्त्याने मागितली माफी; म्हणे, आम्ही...

Web Title: Cm Eknath Shinde Aurangabad Visit Shiv Sena Activist Purification Road

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CM Eknath ShindeShiv Sena