Raj Thackeray : सूचक विधानामुळे चर्चांना पुन्हा उधाण; म्हणाले, 'सध्या...'

राज्यातील सत्ता परिवर्तानंतर आता सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष आगामी महापालिका निवडणुकांवर लागले आहे.
Raj Thackeray
Raj Thackeray Sakal

Raj Thackeray News : राज्यातील सत्ता परिवर्तानंतर आता सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष आगामी महापालिका निवडणुकांवर लागले आहे. यासाठी अनेकांनी मोर्चे बांधणीला सुरूवातदेखील केली आहे. त्यात मध्यंतरी राज ठाकरे आणि भाजप नेत्यांसह मुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे युतीच्या जोरदार चर्चा रंगल्या आहे. त्यात आता राज ठाकरे यांनी केलेल्या सूचक विधानमुळे पुन्हा एकदा भाजप मनसेच्या युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे.

Raj Thackeray
Kruna Munde : दसरा मेळाव्याच्या वादात आता करूणा मुंडेंची उडी; म्हणाल्या, 'संघर्ष...'

येत्या 18 ते 23 सप्टेंबर दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यापूर्वी एमआयजी क्लब येथे पत्रकारांशी राज ठाकरेंनी संवाद साधला. त्यावेळी काही पत्रकारांनी 'तुम्ही रेल्वेने नागपूरला का जात आहात ? असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना 'सध्या काही डबे जोडण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे मी रेल्वेनेच नागपूरला जातोय, असे सूचक उत्तर दिले. मात्र, राज यांच्या या उत्तरामागे अनेक सूचक इशारे असल्याचे मत राजकीय जाणकारांचे आहे. राज यांच्या या विधानानंतर आता पुन्हा एकदा भाजप-मनसे यांच्यातील युतीबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.

Raj Thackeray
Bengaluru : रूग्णासाठी वाहतूक कोंडीत अडकलेला डॉक्टर 45 मिनिटं धावला अन्...

काय असणार रणनीती

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, या दौऱ्यामध्ये पक्ष संघटन वाढविणे हा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या नागपूरात राज ठाकरे 18 आणि 19 सप्टेंबर असे दोन दिवस मुक्कामी असणार आहेत. कुठल्याही परिस्थितीत विदर्भात शिवसेनेची ताकद वाढणार नाही, याचीदेखील काळजी मनसेकडून घेतली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी शिवसेनेच्या मतांमध्ये विभाजन व्हावे, याकरता भाजपचीही गुप्त तयारी सुरू आहे.

ज्या भागांत शिवसेनेचे प्राबल्य आहे, अशा भागांत मनसेचे उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे भाजप आणि मनसेचं गणित जुळून आल्यास नागपूर महापालिकेत मनसेचे खाते पुन्हा उघडू शकते. याचा फायदा मनसेला चंद्रपूर आणि अमरावती महानगरपालिकांमध्येही होऊ शकतो.

Raj Thackeray
Cabinet Meeting : बैठकीतील महत्त्वाचे निर्णय कोणते; वाचा थोडक्यात

असा असणार राज ठाकरेंचा विदर्भ दौरा

राज ठाकरे 17 सप्टेंबरला सायंकाळी रेल्वेने नागपूरसाठी रवाना होणार असून, 18 सप्टेंबरला सकाळी त्यांचे नागपुरात आगमन होणार आहे. त्यानंतर राज ठाकरे 23 सप्टेंबरपर्यंत विदर्भात तळ ठोकून असणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ठाकरे नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती महानगरपालिकांच्या निवडणुकांसंदर्भात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहे.

नागपुरात 18 आणि 19 सप्टेंबर असे दोन दिवस राज ठाकरे मुक्कामी असणार आहेत. त्यानंतर 20 सप्टेंबरला ते नागपूरवरून चंद्रपूरसाठी रवाना होणार आहेत. येथे ते एकदिवस मुक्कामी असतील. 21 सप्टेंबरला चंद्रपूरवरून अमरावतीसाठी राज ठाकरे रवाना होणार असून, 21 आणि 22 सप्टेंबर असे दोन दिवस राज ठाकरे येथील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. त्यानंतर 23 सप्टेंबरला ठाकरे मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com