
पैठण : श्री संत एकनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील वारकरी, भाविकांना दिंडी मार्गावर सोयी-सुविधा देण्यात याव्यात, अशा आशयाच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांना आदेश दिले आहेत.