CM Mazi Shala Sundar Shala : ‘माझी शाळा’ उपक्रमात शासकीय विद्यालयांचा झेंडा ; भोंडवे पाटील शाळा चमकली

राज्यातील शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान स्पर्धेचा रविवारी निकाल जाहीर झाला.
CM Mazi Shala Sundar Shala
CM Mazi Shala Sundar Shala sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान स्पर्धेचा रविवारी निकाल जाहीर झाला. राज्यस्तरीय खासगी शाळा स्पर्धेत भोंडवे पाटील शाळा, बजाजनगर (ता. गंगापूर) शाळेने तृतीय क्रमांक पटकावला, तर विभागस्तरीय स्पर्धेत शासकीय गटात जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, सातारा आणि खासगी गटात जालन्यातील दशरथ बाबा महाडीक विद्यालयाने प्रथम पारितोषिक प्राप्त केले.

शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी; तसेच स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी वातावरण निर्माण व्हावे, यासाठी १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये हे अभियान राबविण्यात आले. विविध बाबींवर शाळांचे मूल्यांकन केंद्र स्तर, तालुका स्तर आणि जिल्हा स्तरावर करण्यात आले. स्पर्धेत राज्य स्तर, विभाग स्तरावर पुरस्कारप्राप्त शाळांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी मुंबई येथे गौरविण्यात येणार आहे.

आम्ही नेहमीच विद्यार्थीहिताचे उपक्रम शाळेत राबवीत असतो. माझी शाळा उपक्रमासाठी आमची शाळा पात्र ठरणार, याची खात्री होती. कारण, या स्पर्धेचे निकष आम्ही प्रभावीपणे राबविले होते. यामध्ये सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे योगदान आहे.

- मंजुश्री राजगुरू, मुख्याध्यापिका, केंद्रीय प्राथमिक शाळा, सातारा

CM Mazi Shala Sundar Shala
Mazi Shala Sundar Shala : पुणे महापालिका गटामध्ये कात्रजचे विद्यानिकेतन अव्वल

जिल्हास्तरीय निकाल शासकीय

  • प्रथम : जि.प. शाळा, जळगाव मेटे (फुलंब्री)

  • द्वितीय : जि.प. शाळा, केऱ्हाळा (सिल्लोड),

  • तृतीय : जि.प. शाळा, तारू पिंपळगाव (पैठण)

  • खासगी : भोंडवे पाटील स्कूल, बजाजनगर (राज्य स्तरासाठी निवड)

  • प्रथम : चैतन्य व्हॅली इंटरनॅशनल स्कूल, करमाड

  • द्वितीय : कौशल्या विद्यामंदिर ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, पाटेगाव

  • तृतीय :एस.बी. हायस्कूल, गोंदेगाव (सोयगाव)

विभागस्तरीय निकाल शासकीय

  • प्रथम : जि.प. प्राथमिक शाळा, सातारा (छत्रपती संभाजीनगर)

  • द्वितीय : सीपीएस स्कूल, मानवत (परभणी)

  • तृतीय : जि.प. शाळा, जरेवाडी (बीड)

  • खासगी

  • प्रथम : दशरथ बाबा महाडीक विद्यालय, जालना

  • द्वितीय : बहिर्जी स्मारक विद्यालय, वसमत (हिंगोली)

  • तृतीय : छत्रपती शिवाजी हायस्कूल, जालना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com