Mazi Shala Sundar Shala : पुणे महापालिका गटामध्ये कात्रजचे विद्यानिकेतन अव्वल

राज्य सरकारच्या ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात महापालिका गटामध्ये पुणे महापालिकेच्या कात्रज येथील डॉ. यशवंत गणपत शिंदे विद्यानिकेतन (क्रमांक १९) या शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला.
Mazi Shala Sundar Shala
Mazi Shala Sundar Shalasakal
Updated on

पुणे : राज्य सरकारच्या ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात महापालिका गटामध्ये पुणे महापालिकेच्या कात्रज येथील डॉ. यशवंत गणपत शिंदे विद्यानिकेतन (क्रमांक १९) या शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क्रीडा प्रबोधिनी विद्यालय, उद्यमनगरने द्वितीय क्रमांक मिळविला. या दोन्ही शाळा ‘आदर्श शाळा’ या विशेष प्रकल्पातून पुढे आल्या आहेत.

शिक्षण विभागाकडून हे अभियान राबविले जात आहे. या अंतर्गत विविध गटांमध्ये राज्यभरातील शाळांना बक्षीसे देण्यात आली. डॉ. शिंदे विद्यानिकेतनमध्ये शिष्यवृत्तीसह स्पर्धा परिक्षांची तयारी करून घेतली जाते. खेळ, स्वच्छता व पर्यावरणपूरक उपक्रमांना प्राधान्य दिले जाते. अद्ययावत ग्रंथालय, विनादप्तर शाळा, ई-लर्निंग वर्ग, सर्वाधिक पट अशी शाळेची वैशिष्ट्ये आहेत.

पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये सुधारणा घडविण्यासाठी ‘आदर्श शाळा’ उपक्रम राबविला आहे. त्यात ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात कात्रजमधील शिंदे विद्यानिकेतन शाळेला प्रथम क्रमांक मिळाल्याचा आनंद वाटला. पिंपरी चिंचवडमध्येही आम्ही हा प्रयोग राबविला होता. तेथील क्रीडा प्रबोधिनीला द्वितीय क्रमांक मिळाल्याने आनंद द्विगुणित झाला.

- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

Mazi Shala Sundar Shala
Adarsh shala : ‘आदर्श’साठी आणखी ३० शाळा ; एकूण ४५ शाळांमध्ये या प्रकल्पाची अंमलबजावणी होणार

खासगी शाळा गटात रमणबाग तृतीय

या अभियानातील खासगी शाळांच्या गटामध्ये निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाने प्रथम क्रमांक, तर शनिवार पेठेतील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग या शाळेने तृतीय क्रमांक मिळविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com