sambhaji nagar
sambhaji nagar sakal

Sambhaji Nagar News : बदलत्या वातावरणाचा परिणाम सर्दी, खोकल्याची डोकेदुखी

हिवाळ्यात सर्दी, खोकला, ताप अशा रुग्णांच्या संख्येत वाढ होते. हे सामान्य आहे. त्यासाठी या दिवसात खान- पान चांगले ठेवायला हवे. शरीरातील पाण्याचे प्रमाण व्यवस्थित ठेवावे. साबणाने सतत हात धुवावेत. विशेष म्हणजे, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार घ्यावेत.

छ्त्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांत बदललेल्या वातावरणामुळे शहरात सर्दी, खोकला, ताप या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. व्हायरलची साथ सुरू झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने यावर औषधी घ्यावीत, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

सामान्यत: हिवाळ्यात थंड हवा सुटत असल्याने या दिवसात सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोके दुखणे, कोरडा खोकला या आजारांच्या रुग्णांचे प्रमाण वाढते. गेल्या काही दिवसांपासून शहरात तापमानात घट होत आहे. रात्रीच्या वेळेला तर थंडी जास्त जाणवत असल्याने, सध्या या आजाराच्या रुग्णांत वाढ होत आहे. महापालिका आरोग्य केंद्र, गल्लीत असलेले छोट्या- मोठ्या दवाखान्यात तर रुग्णांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळते. यामुळे इतर गंभीर आजार असणाऱ्या रूग्णांनी विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

sambhaji nagar
Sambhaji Nagar : रामराज्य यात्रेचा जल्लोष

सर्दी, ताप, खोकला अशा आजाराचे रुग्ण वाढत आहेत. सध्या प्रशासनाकडे व्हायरलच्या २७८ रूग्णांची नोंद असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले. हिवाळ्यात सर्दी, खोकला, ताप अशा रुग्णांच्या संख्येत वाढ होते. हे सामान्य आहे. त्यासाठी या दिवसात खान- पान चांगले ठेवायला हवे. शरीरातील पाण्याचे प्रमाण व्यवस्थित ठेवावे. साबणाने सतत हात धुवावेत. विशेष म्हणजे, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार घ्यावेत.

- डॉ. अविनाश लांब, श्वसन विकारतज्ज्ञ, विभागप्रमुख, घाटी रुग्णालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com