Aurngabad : जिल्हाधिकारी यांचा शेतकऱ्याच्या घरी मुक्काम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sunil chavan

जिल्हाधिकारी यांचा शेतकऱ्याच्या घरी मुक्काम

गल्लेबोरगाव : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथे सोमवारी (ता.१५) रात्री एका शेतकऱ्याच्या घरी मुक्काम करून मंगळवार गावात फेरफटका मारताना ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी गावकऱ्यांना गल्लेबोरगावात लसीकरण, मतदार नोंदणीचे आवाहन केले.

खुलताबाद तालुक्यातील विविध गावांना दिवसभर भेटी देऊन जिल्हाधिकारी हे सायंकाळी गल्लेबोरगाव येथील शेतकरी भास्कर खोसरे यांच्या घरी मुक्कामी थांबले होते. मंगळवारी मंगळवारी (ता.१६) पहाटेच त्यांनी गल्लेबोरगाव ते शिवना-टाकळी पर्यंत पाच किलोमीटर मॉर्निंग वॉक केला. येथे यावेळी त्यांनी शिवना-टाकळी मध्यम प्रकल्पाजवळ व्यायामासाठी तसेच पोहण्यासाठी आलेल्या गावकऱ्यांशी संवाद साधला. यानंतर शिवना टाकळी येथील अशोक आहेर यांच्या प्राचीन जुन्या वाड्याला भेट देऊन पाहणी केली.

यानंतर गल्लेबोरगाव येथील ग्रामसभेस जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, गावातील सर्व नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन केले. जे नागरिक लस घेणार नाही. त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार नसल्याचा इशारा दिला. गावात जास्तीत जास्त मतदारांनी नोंदणी करून घेण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी तहसीलदार सुरेंद्र देशमुख, सरपंच विशाल खोसरे, उपसरपंच रामदास चंद्रटीके, सेवा संस्थचे अध्यक्ष तुकाराम हारदे, उपाध्यक्ष दिलीप बेडवाल, ग्रामपंचायत सदस्य संजय भागवत, संतोष राजपूत, शेषराव भागवत, ग्राम विकास अधिकारी विनायक पवार, तलाठी राजेंद्र कुलकर्णी, पोलिस पाटील सिंधु बडे आदींची उपस्थिती होती.

loading image
go to top