कॉलेज मध्ये राहायचे असेल तर आम्ही सांगतो तसे वागावे

कॉलेज मध्ये राहायचे असेल तर आम्ही सांगतो तसे वागावे
Published on: 
कॉलेजमध्ये राहायचे, तर आम्ही सांगतो तसे वाग! --- विद्यार्थ्यास मारहाण; मध्यस्थी करणाऱ्या मामा, मावसभावावर चाकूने वार --- छत्रपती संभाजीनगर, ता. २९ ः ‘कॉलेजमध्ये राहायचे असेल, तर आम्ही सांगतो तसे वागावे लागेल’, असे धमकावत विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली. यासह मध्यस्थी करणाऱ्या त्याच्या मामा आणि मावस भावावर चाकूने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी (ता. २७) एमआयटी कॉलेजच्या मंथन हॉल परिसरात घडली. अमोल चव्हाण (वय २८), करण सरोदे (वय २२) आणि त्यांचा एक साथीदार, अशी चाकू हल्ला करणाऱ्यांची नावे आहेत. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. प्रकरणी प्रणव राम नरवडे ( वय १८, रा. मिलिंदनगर, उस्मानपुरा) याने तक्रार दिली. त्यानुसार, प्रणव हा एमआयटी कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षात शिकतो. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास तो मित्र मयूर दाभाडे आणि मानव नरवडे यांच्यासोबत मंथन हॉलसमोरून घरी जात होता. त्यावेळी करण सरोदे याने त्याला अडवून, तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटला आहात? मी कोण आहे, हे तुम्हाला माहीत नाही, असे म्हणत वाद घातला. कॉलेजमध्ये राहायचे असेल तर आम्ही सांगू तसे वागावे लागेल, अशी धमकी दिली. मारहाण सुरू असल्याने प्रणवने मामा विकी त्रिभुवन (वय ३०) आणि मावस भाऊ प्रतीक भोसले (वय १७) यांना फोन करून बोलावले. त्यांनी मध्यस्थी करत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी अमोल याने चाकूने हल्ला केला. अमोलला पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रतीकच्या दोन्ही हातांवर चाकूने वार करण्यात आले. विकी यांच्या उजव्या मांडीवर आणि डाव्या हातावरही वार झाले. पोलिसांनी धाव घेताच आरोपी पळून गेले. जखमींवर उपचारानंतर या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. …… ‘रॅगिंग’ची किनार ? एकंदरीत ही घटना पाहता हा सर्व प्रकार रॅंगिंगसारखा असल्याचे दिसते. याबाबत सध्या ठोस कुणी बोलत नसले, तरी पोलिस तपासात ही बाब समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.