
छत्रपती संभाजीनगर : ‘धर्माच्या नावाखाली द्वेष पसरवणे, निवडणूक आयोगाचा गैरवापर करणे आणि मतांची चोरी करणे, हाच भाजपचा पॅटर्न आहे. पण, जनता आता त्यांच्या डावांना बळी पडणार नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनता भाजपला धडा शिकवेल, अशी टीका काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर केली.