उड्डाणपुलावरून कंटेनर कोसळला

उड्डाणपुलावरून कंटेनर कोसळला
Published on: 
फोटो जालना : उड्डाणपुलाचा कठडा तोडून खाली कोसळलेला कंटेनर. (छायाचित्र : शरद खानापुरे) ................ उड्डाणपुलावरून कंटेनर कोसळला चालक, क्लीनर जागीच ठार; कठडा तोडून थेट हॉटेलवर कोसळला सकाळ वृत्तसेवा जालना, ता. ३१ : शहरातील नूतन वसाहत परिसरातील उड्डाणपुलावरून भंगार घेऊन जाणारा कंटेनर शनिवारी (ता. ३१) रात्री १०ः५५ च्या सुमारास थेट खाली असलेल्या हॉटेलवर कोसळला. या भीषण अपघातात कंटेनरचालक आणि क्लीनर अशा दोघांचा जागीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. रात्री उशिरापर्यंत मृतांची ओळख पटलेली नव्हती. या अपघातात उड्डाणपुलाखालील एकता हॉटेलचे मोठे नुकसान झाले. शहरातील अंबड चौफुली येथून रेल्वेस्थानकाच्या दिशेने भंगार घेऊन जाणारा कंटेनर शनिवारी रात्री नूतन वसाहत परिसरातील उड्डाणपुलावरून जात होता. पुलावरील वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कंटेनरने पुलाचा सुरक्षा कठडा तोडला आणि थेट खाली असलेल्या एकता हॉटेलवर कोसळला. या भीषण अपघातात कंटेनरचालक आणि वाहकाचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. कंटेनर कोसळल्यामुळे हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. .............. इन्फो वळणावरील अपघाताचा पूर्वतिहास नूतन वसाहत उड्डाणपुलाच्या वळणावर २०१८-१९ मध्येही असाच अपघात झाला होता. त्या वेळी ट्रक पुलाच्या सुरक्षा कठड्यात अडकल्याने खाली कोसळण्यापासून बचावला होता. त्यामुळे जीवितहानी झाली नव्हती. मात्र, त्या अपघातानंतर वळणावरील कठडा तुटलेल्या अवस्थेतच होता. तीन ते चार महिन्यांपूर्वी महापालिकेने या ठिकाणी नव्याने कठडा बांधला होता. असे असतानाही पुन्हा भीषण अपघात झाल्याने उड्डाणपुलावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, कंटेनर हॉटेलवर पडले त्या वेळी हॉटेलमध्ये कोणी दबले आहे का? याचीही रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून खात्री झाली नाही. कंटेनर हटवल्याच्या नंतरच हॉटेलमध्ये कोणी होते का हे स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. ....... इन्फो औद्योगिक वसाहतीकडे निघाला होता कंटेनर भंगार घेऊन कंटेनर चालत औद्योगिक वसाहत येथून निघाला होता. मात्र, अंबड चौफुली येथून त्याचा रस्ता चुकल्याने तो शहरात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.