esakal | 'काळजी घ्या, कोरोना आणि डेंगीची लक्षणे सारखीच'
sakal

बोलून बातमी शोधा

corona

'काळजी घ्या, कोरोना आणि डेंगीची लक्षणे सारखीच'

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद: शहरात प्रत्येक तिसऱ्या वर्षी डेंगीची साथ पसरते. त्यामुळे यंदा डेंगीचा धोका वाढला आहे. त्यात डेंगी व कोरोनाची सर्दी-खोकला-ताप ही सारखीच प्राथमिक लक्षणे आहेत. त्यामुळे नागरिकांनी ही लक्षणे आढळून येताच सावध होऊन कोरोना व डेंगी संदर्भातील चाचणी करून घ्यावी असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी केले आहे.

आता पावसाळ्यातील साथ रोगांचा धोका वाढला आहे. डेंगीने दोन वर्षांपूर्वी अनेकांचे बळी गेले होते. महापालिकेच्या रेकॉर्डनुसार प्रत्येक तिसऱ्या वर्षी शहरात डेंगीचा साथ पसरते. त्यानुसार यंदा डेंगीचा धोका व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात डॉ. पाडळकर यांनी सांगितले की, पावसाळा सुरू झाल्याने मलेरिया, डेंगी व इतर साथीचे आजार वाढण्याचा धोका आहे. शहरात जुलै महिन्यात डेंगीचे सहा संशयित आढळले असले तरी त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले, ही समाधानाची बाब आहे. पण कोरोना व डेंगीची प्राथमिक लक्षणे सारखीच आहे. सर्दी, खोकला, ताप येणे आणि थंडी वाजणे अशी लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी तातडीने कोरोना व डेंगी संदर्भातील चाचणी करून घ्यावी, असे आवाहन डॉ. पाडळकर यांनी केले आहे.

हेही वाचा: नांदेड जिल्ह्यात दीड महिन्यात तब्बल ५६ टक्के पाऊस

पाणी उकळून प्या, गर्दीत जाणे टाळा-
कोरोनाची सर्दी, खोकला ताप, वास न येणे यासह इतर लक्षणे आहेत. डेंगीची प्राथमिक लक्षणे ताप-सर्दी-खोकला-थंडी, मळमळ, उलट्या, अंगदुखी अशी आहेत. कोरोनामुळे फुफुसाला बाधा पोचते तर डेंगीच्या रुग्णाच्या मेंदूमध्ये ताप उतरतो. त्याकरिता तातडीने चाचणी करून घ्यावी, कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लस घेण्यासोबतच मास्कचा वापर, गर्दी टाळणे, कामाशिवाय घराबाहेर न पडणे, सॅनेटायझरचा वापर करावा. तर डेंगी, मलेरिया पासून बचाव करण्यासाठी पाणी उकळून पिणे, बाहेरची पदार्थ खाणे टाळणे, डासापासून संरक्षण करणे, पाण्यामध्ये अ‍ॅबेट, तुरटी टाकणे, घराचा परिसर स्वच्छ ठेवणे असे आवाहन डॉ. नीता पाडळकर यांनी केले.

loading image