esakal | नांदेड जिल्ह्यात दीड महिन्यात तब्बल ५६ टक्के पाऊस
sakal

बोलून बातमी शोधा

rain

नांदेड जिल्ह्यात दीड महिन्यात तब्बल ५६ टक्के पाऊस

sakal_logo
By
सकाळ वृत्तेसवा

नांदेड: जूनमध्ये दमदार सुरवात केलेल्या पावसाने जुलैमध्येही जोर धरला आहे. या पावसामुळे खरिप पिकांना दिलासा मिळाल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. यंदा पावसाळ्याच्या दीड महिन्यात तब्बल ५६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. तर आठ मंडळात तीनशे मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. मराठवाड्यात हमखास पावसाचे क्षेत्र असलेल्या नांदेड जिल्ह्यात पावसाळ्याच्या जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सरासरी ८१४.१८ मिलीमीटर पाऊस पडतो. तर जून ते ऑक्टोबर या पाच महिन्याची सरासरी ८९१.३० मिलीमीटर आहे.

मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीच्या १०७ टक्के पावसाची नोंद झाली होती. यंदाही भारतीय हवामान खात्याने चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्याप्रमाणे पावसाचे आगमनही झाले. जूनमध्ये जोरदार सुरवात केलेल्या पावसाने मध्यतंरी ओढ दिल्याने पिके धोक्यात आली होती. परंतु जुलैमध्ये पावसाने पुन्हा जोर धरल्याने खरिपातील पिकांना दिलासा मिळाला आहे.
यंदा ता. एक जून ते ता. १५ जुले या दीड महिन्याच्या काळात जिल्ह्यात ५६.३० टक्क्यानुसार सरासरी ४५०.१० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे यंदा पाऊस सरासरीपेक्षा अधिक होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. मागील दीड महिन्यात जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळात पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील उमरी मंडळात सर्वाधिक ३५२ मिलीमीटर पाऊस झाला तर सर्वात कमी सरसम मंडळात १४३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे खरिप हंगामातील पिकांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा: नांदेडमधील पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले; महापालिकेचे दुर्लक्ष

आठ मंडळात जास्त पाऊस
जिल्ह्यातील आठ मंडळात तीनशे मिलीमीटरपेक्षा अधीक पाऊस झाला आहे. यात उमरी ३५२, मुदखेड ३३४, तरोडा ३३२, शिवणी ३३२, कापसी ३२५, कुंडलवाडी ३१८, अर्धापूर ३०२ तर सिंधी मंडळात ३०१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील ४५ मंडळात दोनशे ते तीनशे मिलीमीटर पाऊस झाला. तर २८ मंडळात दोनशे मिलीमीटरपर्यंत पाऊस झाला आहे.

loading image