esakal | Corona : थरथरत्या हातांना विळखा...
sakal

बोलून बातमी शोधा

Corona News Aurangabad

शहरातील ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यात दोन हजार ९९३ पैकी १५६ वृद्धांना सर्दी, खोकला, ताप, श्‍वास घेण्यास त्रास अशी कोरोनासदृश लक्षणे आढळून आली. अशा वृद्धांची आरोग्याची काळजी कशी घ्यायची याच्या सूचनाही केल्या जात आहेत. 

Corona : थरथरत्या हातांना विळखा...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या घटत असली तरी दुसरीकडे मृत्यूचे आकडे वाढतच आहेत. आतापर्यंत झालेल्या मृत्यूचा विचार केल्यास ९० टक्के वृद्धांचाच समावेश आहे. त्यामुळे महापालिकेने शहरातील ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यात दोन हजार ९९३ पैकी १५६ वृद्धांना सर्दी, खोकला, ताप, श्‍वास घेण्यास त्रास अशी कोरोनासदृश लक्षणे आढळून आली. अशा वृद्धांची आरोग्याची काळजी कशी घ्यायची याच्या सूचनाही केल्या जात आहेत. 

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तेराशेवर पोचली आहे. रोज नवनवीन वसाहतींत रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या तीन-चार दिवसांत यात ९० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाण वृद्धांचेच आहे. त्यामुळे शहरातील वृद्धांचे महापालिकेच्या आरोग्य पथकांकडून सर्वेक्षण केले जात आहे. आजपर्यंत या पथकांनी शहरातील सुमारे तीन लाखांपेक्षा अधिक घरांचे सर्वेक्षण केले असून यात १६ लाख नागरिकांची आरोग्य तपासणी केली आहे. २० हजार ११३ घरांच्या सर्वेक्षणात दोन हजार ००३ वृद्ध आढळून आले.

क्लिक करा- घाबरू नका, तब्बल नव्वद टक्के रुग्ण ठणठणीत बरे होणार

या वृद्धांना घरातून बाहेर पडू नका, असे सांगण्यात आले आहे. दहा वर्षांपेक्षा अधिक लहान बालकांचीही विशेष काळजी घेण्याच्या सूचना केल्या जात आहेत, असे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मेघा जोगदंड यांनी सांगितले. सर्वेक्षणात दोन हजार ९९३ पैकी १५६ वृद्धांना सर्दी, खोकला, ताप, श्‍वास घेण्यास त्रास अशी कोरोनासदृश लक्षणे आढळून आली. त्यामुळे या वृद्धांना पुढील उपचारासाठी महापालिकेच्या फिव्हर क्लिनिकमध्ये पाठविण्यात आले. 

मधुमेह, हायपर टेन्शनचा त्रास 
महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात वृद्धांचे इतर आजारही समोर येत आहेत. आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणात आढळलेल्या वृद्धांपैकी ७८८ जणांना मधुमेह, हायपर टेन्शन, शारीरिक विकनेस अशा आजारांचा त्रास असल्याचे समोर आले. त्यामुळे आजारी वृद्धांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना त्यांच्या घरच्यांना करण्यात आल्या आहेत. 

हेही वाचा- शिवसेनेच्या नाकीनऊ आणलेल्या या माजी आमदाराने राजीनामा कुठं दिला?

एकूण  ८९ जणांची सुटी 
सोमवारी दिवसभरात ८९ जणांना सुटी देण्यात आली. त्यामुळे आत्तापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ७७० एवढी झाली आहे. सोमवारी किलेअर्क येथून ५३ जणांना सुटी देण्यात आली. तसेच एमआयटी मुलांचे वसतिगृह येथून दोन, घाटी रुग्णालयातून नऊ, जिल्हा सामान्य रुग्णालयातून १४, एमजीएम हॉस्पिटलमधून नऊ तर धूत हॉस्पिटलमधून दोन अशा एकूण ८९ रुग्णांना सुटी देण्यात आली.

loading image
go to top