esakal | धक्कादायक ! औरंगाबाद जिल्ह्यात १० हजार ३०२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

3coronavirus_23

औरंगाबाद जिल्ह्यातील (ग्रामीण) एकूण ९ तालुक्यात शनिवारी (ता.१२) अखेर एकूण १० हजार ३०२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. या पैकी ८ हजार २८४ रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला असून, १ हजार ८१५ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.उल्हास गंडाळ यांनी दिली.

धक्कादायक ! औरंगाबाद जिल्ह्यात १० हजार ३०२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

sakal_logo
By
दुर्गादास रणनवरे

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील (ग्रामीण) एकूण ९ तालुक्यात शनिवारी (ता.१२) अखेर एकूण १० हजार ३०२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. या पैकी ८ हजार २८४ रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला असून, १ हजार ८१५ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.उल्हास गंडाळ यांनी दिली.
शनिवार १२ सप्टेंबर अखेर जिल्ह्यातील ९ तालुक्यातील २०३ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्याचा (ग्रामीण) डेथ रेट २.० टक्के झाला आहे.

शासनाने कान उपटताच प्रशासकांना जाग, औरंगाबाद महापालिकेत ३० अधिकाऱ्यांना पदोन्नती

तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या
शनिवारी (ता.१२) पर्यंत औरंगाबाद ३१, फुलंब्री ०४, गंगापूर ५२, कन्नड ३०, खुलताबाद १२, सिल्लोड ०१, वैजापूर १८, पैठण ३६ आणि सोयगाव ०१ असे एकूण १८५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. या १८५ रुग्णांपैकी ९३ रुग्णांची आरटीपीसीआर टेस्ट घेण्यात आली तर उर्वरित ९२ रुग्णांची अँटीजेन टेस्ट घेण्यात आली. शनिवार पर्यंत जिल्ह्यातीतून एकूण आरटीपीसीआर तपासणी केलेल्या प्रोग्रेसिव्ह रुग्णांची संख्या ५ हजार ६४८ तर ४ हजार ६५४ रुग्णांची अँटीजेन चाचणी करण्यात आल्याचे डॉ. गंडाळ यांनी स्पष्ट केले.

मृतरुग्णांची संख्या
शनिवारी (ता.१२) पर्यंत औरंगाबाद ३०, फुलंब्री ११, गंगापूर ५२, कन्नड २५, खुलताबाद ०८, सिल्लोड ३१, वैजापूर १७, पैठण २४ आणि सोयगाव ०५ असे एकूण २०३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. जिल्ह्याचा डेथ रेट आता २. ० झाला आहे.
RTO NEWS : तारीख मिळालेले येईनात, गरजूला तारीख मिळेना ! वाचा सविस्तर !


आरटीपीसीआर चाचणी केलेल्या रुग्णांची संख्या
शनिवारी (ता.१२) रोजी आरटीपीसीआर तपासणी केलेल्या रुग्णांची संख्या औरंगाबाद १७, फुलंब्री ०३, गंगापूर २३, कन्नड ०७, खुलताबाद ०१, सिल्लोड ०१, वैजापूर १७, पैठण २३ आणि सोयगाव ०१ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.

अँटीजेन चाचणी केलेल्या रुग्णांची संख्या
शनिवारी (ता.१२) रोजी आरटीपीसीआर तपासणी केलेल्या रुग्णांची संख्या औरंगाबाद १७, फुलंब्री ०३, गंगापूर २३, कन्नड ०७, खुलताबाद ०१, सिल्लोड ०१, वैजापूर १७, पैठण २३ आणि सोयगाव ०१ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.

संपादन - गणेश पिटेकर

loading image