
औरंगाबाद: जिल्ह्यातील नवीन कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. देशात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या पहिल्या दहा जिल्ह्यात औरंगाबादचा समावेश आहे. मागील 24 तासांत कोरोनाच्या 617 नवीन रुग्णाचं निदान झालं आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या रोज वाढत असल्याने प्रशासनासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात आज 278 जणांनी कोरोनावर मात केली आहे त्यामध्ये मनपा हद्दीतील 208 तर ग्रामीण भागातील 70 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचा आकडा 50 हजार 168 झाला आहे. 617 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 55 हजार 958 झाली आहे.
कोरोनाने जिल्ह्यात 1 हजार 326 जणांचा मृत्यू झाला असून सध्या एकूण 4 हजार 464 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
मनपा ( 344 ) घाटी परिसर (3), जुना बाजार (1), विश्वभारती कॉलनी (1), एन-2 सिडको (10), बीड बाय पास परिसर (10), जयभीम नगर (3),नारेगाव (1), शहानुरवाडी (5), म्हाडा कॉलनी (5), गारखेडा (14), सातारा परिसर (8), शंभू महादेव नगर (1), संजय नगर (4), ज्योती नगर (3), आकाशवाणी (2), पैठण रोड परिसर (2),पिसादेवी (1),साई स्पोर्ट ॲथॉरिटी (1), छावणी (1),मनिषा कॉलनी (2),उस्मानपुरा (1), श्रेय नगर (5), वेदांत नगर (3),गजानन नगर (3), टिळक नगर (2), क्रांती चौक परिसर (2), स्नेह नगर (2), सिल्कमिल कॉलनी (1),कांचनवाडी (2),कर्णपुरा (1), नागेश्वरवाडी (5), टिव्हि सेंटर (4), जाधववाडी (6),बाबा पेट्रोल पंप (1), बजाज हॉस्पिटल (2), मुकुंदवाडी (8), एकता कॉलनी (1),खडकेश्वर (2),टाईम्स कॉलनी (1),
नागसेन कॉलनी (1), लक्ष्मी कॉलनी (1),एआयएमएस हॉस्पिटल (1), माजी सैनिक कॉलनी (1), शिवाजी नगर (3), खोकडपुरा (1),हनुमान नगर (4), चंद्रगुप्ता नगरी (1), दशमेश नगर (6), सिडको (1), एन-4 सिडको (2),आंबेडकर नगर (1), कैलास नगर (1), मयुर पार्क (2), युनिव्हरसिटी गेट (1), पडेगाव (4), नंदनवन कॉलनी (2), नक्षत्रवाडी (1),बन्सीलाल नगर (3), देवा नगरी (1),हर्सूल (6), जवाहर कॉलनी (2),शिल्प नगर (1), तुकोबा नगर (1), विठ्ठल नगर (2), जयभवानी नगर (4), एन-3 सिडको (1), ज्ञानेश्वर नगर (1), चिकलठाणा (4), हडको (8), पुंडलिक नगर (6), विश्रांती नगर (1), भारत नगर (1),औरंगपुरा (3), गणेश नगर (1),एन-9 (6),सावरकर नगर (1), रेल्वे स्टेशन परिसर (3),गुलमोहर कॉलनी (3), एन-6 सिडको (10), योगता सो. (1), पवन नगर (1), एन-7 सिडको (3),एन-8 (3), एन-12 (5), जटवाडा परिसर (2), साफल्य नगर (1), विशाल नगर (1),देशमुख नगर (1), बालाजी नगर (4), नयन नगर (1),
विमानतळ (1),शेंद्रा (10), खिवंसरा पार्क (1),सेव्हन हिल (2), शिवशंकर कॉलनी (3), प्रताप नगर (1), विष्णू नगर (2), शास्त्री नगर (1), नाथ नगर (1),अलंकार सो. (1),कासलीवाल कॉम्प्लेक्स (1),निराला बाजार (1),गुलमंडी (3), ए.एस क्ल्ब (1), एसबी कॉलनी (1), एल ॲण्ड कंपनी (2), देवगिरी आरएम (1), गादीविहार (1), उल्का नगरी (4), उस्मानपुरा (1), गजानन कॉलनी (1), एपीआय कॉर्नर (1), न्यू शांतीनीकेतन कॉलनी (1), मोरेश्वर सो. (11), ग्रीन लाईफ (1), समर्थ नगर (3), अजब नगर (1),सुंदरवाडी , (1),मोंढा नाका (1),एमजी एम हॉस्टेल (2),नारायण प्लाझा (1), महेश नगर (1), दर्गा रोड परिसर (2), राम नगर (1), व्यकटेश नगर (1), एन-1 सिडको (1),बजरंग चौक (2), सूतगिरणी चौक (2),मिसारवाडी (1), संघर्ष नगर (1), रत्नप्रभा शोरुम (1),सुराणा नगर (1),पदमपुरा (1), अविष्कार नगर (1),मजनू हिल (1),विश्वभारती कॉलनी (1),एन-13 (1), पहाडसिंगपुरा (1),दुर्गामाता कॉलनी (3), सौजन्य नगर (1), आंबेडकर नगर एन-7(2), अन्य (161)
ग्रामीण (54)
लोहगड (1) वाळूज महानगर (6) , इटखेडा (4), बजाज नगर (23), खूलताबाद(1), राजणगाव (1),कन्नड (2), लासूर स्टेशन (1),पींप्री राजा (1),शामवाडी (1), सावंगी (2),पांढरी (1), वडगाव (6),पंढरपूर (1),प्रताप चौक (3), अन्य (58)
एकूण मृत्यू (06)
घाटी मध्ये गधेजळगाव येथील 65 वर्षीय स्री, कोहीनूर कॉलनी येथील 74 वर्षीय पुरूष, दक्षिण जायकवाडी पैठण येथील 68 वर्षीय पुरुष, हडको औरंगाबाद येथील 74 वर्षीय पुरुष, तसेच खाजगी हॉस्पीटल मध्ये न्यू मोंढा जाधववाडी येथील 58 वर्षीय स्री, मकसुद कॉलनी येथील 59 वर्षीय स्री, अशा सहा कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.