esakal | लसीकरणच ‘रामभरोसे’! मंदावलेली गती ठरू शकते ‘डेल्टा प्लस’साठी पोषक
sakal

बोलून बातमी शोधा

corona

लसीकरणच ‘रामभरोसे’! मंदावलेली गती ठरू शकते ‘डेल्टा प्लस’साठी पोषक

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद: देशासह राज्य व औरंगाबाद जिल्ह्यातील लसीकरण मोहिम मंदावली असून त्याचा परिणाम समाजजीवनाच्या आरोग्यावर होत आहे. कमी लसीकरण असलेल्या देशात ‘डेल्टा’ अधिक सक्रिय होण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेकडूनही व्यक्त झाली. त्यामुळे लसीकरण मोहिमेला वेग देण्याची गरज आहे.

पहिल्या लाटेत बाधितांपेक्षा दुसऱ्या लाटेत बाधितांची आकडेवारी मोठी आहे. दुसरी लाट गंभीर होती. पहिल्या लाटेत ‘हर्ड इम्युनिटी’ तयार झाली. तेव्हा लसीकरण नव्हते. दुसऱ्या लाटेवेळी ‘हर्ड इम्युनिटी’ तयार झाल्याचे ‘सिरो’ सर्वेक्षणातून समोर आले. मात्र, लाट थोपवू शकेल अथवा संसर्गाचा आलेख कमी होईल इतकी ही तयार झालेली ‘हर्ड इम्युनिटी’ पूरक नव्हती. देशातील बाधित व इतर लोकसंख्येच्या तुलनेत ‘हर्ड इम्युनिटी’ टक्केवारीत एक आकडीच आहे.

हेही वाचा: दुषित पाणीपुरवठा: राज्यशासन, विभागीय आयुक्त, सीओंना नोटीस

‘डेल्टा प्लस’ विषाणूची घातकता गंभीर असून केवळ ‘हर्ड इम्युनिटी’च्या भरोशावर ती थोपविता येणार नाही. शिवाय लसीकरणाचा जोर फारच मंदावलेला आहे. त्यामुळे तिसरी लाट थोपवताना अनेक समस्या उद्भवू शकतात. गेल्या मेमध्ये व्हारायंट्स ऑफ कंसर्न (कोविड विषाणूचे जनुकीय बदल) १०.३१ टक्के इतका होता. ते जूनमध्ये अर्थातच एकाच महिन्यात ५० टक्क्यांपर्यंत आढळला आहे. त्यामुळे तिसरी लाट व या लाटेत ‘डेल्टा प्लस’
चा धोका कायम आहे.

लसीकरणाला हवी बळकटी-
जागतिक आरोग्य संघटनेने ‘डेल्टा प्लस’चा धोका गंभीर असल्याचे स्पष्ट केले. याशिवाय कोरोना महामारीत कोविड विषाणूच्या जनुकीय संरचना बदलत वेगवेगळया रूपांत संक्रमित होत असल्याची बाब आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, विषाणूतज्ञ डॉ. अनिता चक्रवर्ती यांनी एका परिसंवादात मांडली. आताच्या स्थितीत लसीकरण हाच पर्याय त्यांनी व्यक्त केला. भारतासारख्या देशात लोकसंख्येच्या तुलनेत लसीकरणाची टक्केवारी अत्यंत तोकडी आहे. सर्वात कार्यरत गट असलेल्या तरूणाईंचे लसीकरण काही अंशीच झालेले आहे. त्यांचे लसीकरण अधिक करण्याची गरज आहे.

हेही वाचा: राजेश टोपेंच्या घरासमोर कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचा ठिय्या

जिल्ह्याची लसीकरणाची नगण्य स्थिती

शहरी भागातील लसीकरण

पहिला डोस : ३०.७५ टक्के
दुसरा डोस : ८.९९ टक्के

ग्रामीण भागातील लसीकरण

पहिला डोस : १६. ०० टक्के
दुसरा डोस : ३.६९ टक्के

लक्ष्यित लोकसंख्येच्या तुलनेत जिल्ह्याची एकुण टक्केवारी

पहिला डोस २१.२८ टक्के,
दुसरा डोस ५. ५९ टक्के.

शहरात पहिला डोस (३ लाख ६१ हजार ९०८)

हेल्थ वर्कर : २८ हजार ३५६
फ्रंटलाईन वर्कर : ३७ हजार ६२८
१८ ते ४४ वयोगट : १ लाख ३० हजार ५७२
४५ वर्षांवरील : १ लाख ६५ हजार ३५२

हेही वाचा: Corona Updates: मराठवाड्यात नवीन कोरोना रुग्णसंख्येत घट

शहरात दुसरा डोस (१ लाख ५ हजार ८२६)

हेल्थ वर्कर : १६ हजार १२०
फ्रंटलाईन वर्कर : १८ हजार ८५५
१८ ते ४४ वयोगट : ६७ हजार ५६२
४५ वर्षांवरील : १ लाख ५ हजार ८२६

ग्रामीणमधील पहिला डोस (३ लाख ३७ हजार ७८५)

हेल्थ वर्कर : १२ हजार ४९४
फ्रंटलाईन वर्कर : ३५ हजार ९१०
१८ ते ४४ वयोगट : ६४ हजार ५०२
४५ वर्षांवरील : २ लाख २४ हजार ८७९

ग्रामीणमधील दुसरा डोस (७७ हजार ७१४८४९)
हेल्थ वर्कर : ७ हजार ३३२
फ्रंटलाईन वर्कर : ११ हजार ४७८
१८ ते ४४ वयोगट : १ हजार २७४
४५ वर्षांवरील : ५७ हजार ७६५
--------------------------------------------------
जिल्ह्यात एकूण डोस : ८ लाख ८३ हजार ३६८
(पहिला आणि दुसरा डोस घेतलेल्यांची एकूण संख्या)

loading image