esakal | Corona Vaccination: औरंगाबाद महापालिकेला मिळाल्या तब्बल २१ हजार लसी
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccination

Corona Vaccination: औरंगाबाद महापालिकेला मिळाल्या तब्बल २१ हजार लसी

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद: मोठ्या प्रतीक्षेनंतर महापालिकेला बुधवारी (ता. २८) रात्री १७ हजार ४०० कोविशिल्ड तर चार हजार २०० कोवॅक्सिन लसींचे डोस मिळाले. त्यानुसार गुरुवारी (ता. २९) शहरात ३८ केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. शुक्रवारसाठी (ता. ३०) १४ हजार कोविशिल्ड लसी शिल्लक असून, ४३ लसीकरण केंद्रावर लसीकरण केले जाणार आहे. (corona vaccination in aurangabad know the detail)

कोरोना प्रतिबंधक लसींचा गेल्या काही दिवसांपासून तुटवडा असल्याने नागरिक त्रस्त आहेत. कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर ८४ दिवसांचे आहे पण अनेकांना शंभर पेक्षा जास्त दिवस झालेले असताना लस मिळालेली नाही. दुसऱ्या लसीसाठीची वेटींग तब्बल लाखांवर गेली होती. महापालिकेतर्फे आठवड्यासाठी सुमारे एक लाख लसींची मागणी असताना कधी पाच तर कधी दहा हजार एवढ्या लसींचा साठा दिला जात आहे.

हेही वाचा: औरंगाबादेत कचऱ्यात जिवंत काडतुसे आढळल्याने उडाली खळबळ

बुधवारी रात्री मात्र सुमारे २१ हजार लसींचा साठा महापालिकेला मिळाला. पण रात्री उशिरापर्यंत लस किती मिळणार याची माहिती नसल्याने गुरूवारी फक्त ३८ केंद्रावर लसीकरणाची सोय करण्यात आली होती. लस अचानक आल्याने नागरिकांचीही केंद्रावर गर्दी नव्हती. त्यामुळे शुक्रवारसाठी १४ हजार लसी शिल्लक आहेत. त्यानुसार जास्तीत जास्त केंद्रावर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले.

loading image
go to top