esakal | औरंगाबादेत कोरोना लसीकरणाचा पाच लाखांचा टप्पा पूर्ण
sakal

बोलून बातमी शोधा

लसीकरणाचा वेग वाढला

औरंगाबादेत कोरोना लसीकरणाचा पाच लाखांचा टप्पा पूर्ण

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : महापालिकेने लसीकरणाचा Corona Vaccination पाच लाखांचा टप्पा मंगळवारी (ता. १३) पूर्ण केला आहे. दरम्यान सोमवारी (ता. १२) रात्री शहरासाठी पाच हजार लसी मिळाल्या होत्या. त्या अवघ्या चार तासातच संपल्या. लसींचा साठा शिल्लक नसल्याने बुधवारी (ता. १४) लसीकरण बंद राहण्याची शक्यता आहे. महापालिकेने सोमवारपर्यंत चार लाख ९६ हजार ४२८ नागरिकांचे Aurangabad लसीकरण केले होते. त्यात पहिला डोस घेतलेल्यांची संख्या तीन लाख ७५ हजार ८२८ एवढी आहे तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या एक लाख २० हजार ६०० एवढी आहे. सोमवारी रात्री महापालिकेला Aurangabad Municipal Corporation पाच हजार कोविशिल्ड लसी उपलब्ध झाल्या होत्या. त्यानुसार मंगळवारी ३९ केंद्रावर लसीकरण करण्यात आले. ३४ केंद्रावर दुसरा डोस तर पाच केंद्रावर पहिला डोस देण्यात आला. दिवसभरात चार हजार ८०० नागरिकांचे लसीकरण झाल्यामुळे महापालिकेने पाच लाख लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला असल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.corona vaccination numbers crossed five lakh in aurangabad glp88

हेही वाचा: हुश्श! गंगुबाईचं शूट संपलं; आलिया झाली भलतीच सेंटी

आज लसीकरण राहणार बंद

लसींचा तुटवडा कायम आहे. त्यामुळे लसीकरणाला ब्रेक लागत आहे. केवळ पाच- दहा हजार लसी महापालिकेला मिळत आहे. महापालिकेने ११५ वॉर्डात दररोज २० हजारपर्यंत लसीकरण करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे मिळालेल्या कमी लसी एकाच दिवसात संपत आहेत. सोमवारी रात्री महापालिकेला पाच हजार लसी मिळाल्या पण त्या चार तासातच संपल्या. नव्या लसी मिळाल्या नसल्याने बुधवारी लसीकरण बंद राहणार असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

loading image