esakal | हुश्श! गंगुबाईचं शूट संपलं; आलिया झाली भलतीच सेंटी
sakal

बोलून बातमी शोधा

हुश्श! गंगुबाईचं शूट संपलं; आलिया झाली भलतीच सेंटी

हुश्श! गंगुबाईचं शूट संपलं; आलिया झाली भलतीच सेंटी

sakal_logo
By
शरयू काकडे

अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या 'गंगुबाई काठियावाडी' आगामी चित्रपटाचे शुटिंग रविवारी संपले. ''दिग्ददर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करताना आयुष्य बदलणारे अनुभव शिकायला मिळतात.''अशी भावूक पोस्ट आलियाने सोशल मिडियावर शेअर केली आहे. (Alia Bhatt wraps up Gangubai' shoot calls working with Bhansali an experience of lifetime)

1960 च्या काळात मुंबईतील रेड लाईट एरियामधील सर्वात लोकप्रिय, पॉवरफुल आणि सन्मान असणाऱ्या गंगुबाई या स्त्रीच्या व्यक्तीरेखेची भूमिका आलियाने साकारली आहे. आलियाने चित्रपटाच्या सेटवरील आणि भन्साळी यांच्या टीम सोबतचे काही फोटो इंस्टाग्राम ग्रामवर शेअर केले आहेत.

आलिया सांगते की, 'गंगुबाई काठियावाडी' चित्रपटाने हा प्रवास पुर्ण करताना दोन चक्रीवादळ (निसर्ग- 2020/ तौक्ते-2021) ते कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊन दरम्यानच्या काळात बरेच चढ-उतार पाहिले.''

शुटींगच्या काळात आलिया आणि भन्साळी या दोघांनाही कोरोनाचे संक्रमन झाले होते.

''आम्ही 8 डिसेंबर 2019 मध्ये गंगुबाईचे शुटिंग सुरु केले होते आणि दोन वर्षांनंतर ते आता संपले आहे. कलाकार आणि दिग्दर्शक यांना कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर, दोन लॉकडाऊन आणि दोन चक्रीवादळांच्या काळातही या चित्रपटाचा सेट तसाच उभा होता. या सेटने सामना केलेल्या अडचणींवर एक वेगळा सिनेमा होऊ शकतो. या टीमने इतके साऱ्या अडचणींचा सामाना केल्यानंतर गंगुबाई चित्रपटाचे काम पूर्ण होणे हे माझ्यासाठी एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे.''असेही आलियाने सांगितले.

हेही वाचा: दिव्यांकाने दयाबेनचा रोल करण्याबद्दल केला महत्त्वाचा खुलासा

पद्ममावत आणि बाजीराव मस्तानी सारखे चित्रपट मोठमोठे सेट आणि महागड्या पोशाखासाठी ओळखल्या जाणाऱ्या भन्साळी यांच्यासोबत आलियाचा हा पहिला चित्रपट आहे.

''मी येथून जाताना आयूष्य बदलणारे अनुभव घेऊन जात आहे. भन्साळी सरांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात काम करणे माझे स्वप्न होते. यो दोन वर्षाच्या प्रवासा दरम्यान शिकले ते दुसरे कुठेही शिकले नसते असे मला वाटते. या सेटवरुन बाहेर पडताना मी एक वेगळीच व्यक्ती म्हणून बाहेर पडत आहे. I love you sir! Thank you for being you. तुमच्या सारखे कोणाही असू शकत नाही'' असेही आलिया म्हणाली.

चित्रपटाची कथा प्रसिद्ध लेखक हुसेन झैदी यांनी लिहिलेल्या 'माफिया क्विन ऑफ मुंबई' या पुस्तकावर आधारित आहे

आलिया म्हणते की, ''मी गंगुबाईची भूमिका कधी विसरू शकणार नाही. चित्रीकरणादरम्यान ज्यांनी मला सतत सपोर्ट केला त्यांचे मनापासून आभार मानते'' चित्रपट संपतो तेव्हा तुमच्यातील एक भागही संपतो. आज मी माझ्यातील एक भाग गमावतेय. Gangu, I love you! मला तुझी आठवण येईल.''

या वर्षाच्या सुरवातीस निर्मात्यांनी हा गंगुबाई 30 जुलैला थिएटरमध्ये येईल अशी घोषणा केली होती. अद्याप चित्रपटाच्या नव्या तारखेबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

loading image
go to top