औरंगाबादेत लसींचा काळाबाजार करणारे दोन्ही आरोग्य सेवक निलंबित

३०० रुपये घेऊन कोरोनाची लस दिली जात असल्याच्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिसांनी साजापूर येथील एका घरात छापा टाकून दुरोळे यास रंगेहाथ पकडले होते
corona vaccination
corona vaccinationcorona vaccination
Summary

३०० रुपये घेऊन कोरोनाची लस दिली जात असल्याच्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिसांनी साजापूर येथील एका घरात छापा टाकून दुरोळे यास रंगेहाथ पकडले होते

औरंगाबाद: प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोरोनाची लस चोरून, प्रत्येकी ३०० रुपये घेऊन लसीकरण करणाऱ्या गणेश दुरोळे, सय्यद अमजद सय्यद अहेमद या दोन्ही आरोग्य सेवकांना निलंबित करण्यात आले आहे. लोकांकडून ३०० रुपये घेऊन कोरोनाची लस दिली जात असल्याच्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिसांनी साजापूर येथील एका घरात छापा टाकून दुरोळे यास रंगेहाथ पकडले होते. त्याच्या ताब्यातून कोविड-१९ व्हॅक्सीनची बॉटल (वॉयल), रिकामी बॉटल (वॉयल), नवीन व वापरलेली इंजेक्शन, रोख रक्कम आदी साहित्य जप्त केले होते. कोविड-१९ ची वॉयल्स रांजणगाव उपकेंद्राचा प्रभारी सुपरवायझर सय्यद अमजद याच्याकडून घेतल्याचे दुरोळे याने पोलिसांना सांगितले. त्यावरून पोलिसांना दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

हे दोघे लोकांकडून पैसे घेऊन त्यांना लस देत होते. त्यानंतर त्यांची नावे ऑनलाइन कोविन ॲपवर नोंदवत होते. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून शिस्तीस धरून नाही. त्यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) १९६७ मधील तरतुदीचा भंग केल्याचे प्रथम दर्शनी सिद्ध होते. त्यामुळे या दोघांना सेवेतून तत्काळ निलंबित करण्यात येत असल्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी काढले आहेत. निलंबन कालावधीतील त्यांचे मुख्यालय सोयगाव तालुक्यातील सावळदबारा प्राथमिक आरोग्य केंद्र हे राहील. या आदेशाची नोंद संबंधिताच्या मूळ सेवा पुस्तिकेत घेण्याचेही निर्देश डॉ. गोंदावले यांनी दिले आहेत.

corona vaccination
Nanded Corona Update: जिल्ह्यात सहा नवीन रुग्ण; एकाचा मृत्यू

दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला असल्याने, पोलिसांच्या चौकशीत इतर सर्व बाबी समोर येतील. प्रशासनाच्यावतीने या दोघांची विभागीय चौकशी लावण्यात येईल. पोलिसांचे चार्जशीट आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करण्यात येईल. त्यानंतर त्यांची चौकशी होईल, असे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com