esakal | सोन्याचा भाव घसरला : सराफा बाजारात शुकशुकाट
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad news

कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला आहे. आठवडाभरापासून शेअर मार्केटमध्ये निर्देशांक घसरले आहेत. आता सोन्याच्या किमतीवरही याचा परिणाम झाला आहे. शुक्रवारी (ता. १४) एकाच दिवसात सोन्याच्या किमतीत बाराशे रुपयांनी घट झाली. यात आणखी घट होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. 

सोन्याचा भाव घसरला : सराफा बाजारात शुकशुकाट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला आहे. आठवडाभरापासून शेअर मार्केटमध्ये निर्देशांक घसरले आहेत. आता सोन्याच्या किमतीवरही याचा परिणाम झाला आहे. शुक्रवारी (ता. १४) एकाच दिवसात सोन्याच्या किमतीत बाराशे रुपयांनी घट झाली. यात आणखी घट होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. 

शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर घसरण सुरू आहे. याबरोबर सोने-चांदीच्या किमतीत चढ-उतार बघायला मिळत आहेत. गेल्या आठवडाभरापासून सोन्या-चांदीच्या किमती उतरत असल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले. सोन्याची किमत गुरुवारी प्रती तोळा ४३ हजार ८०० होती. शुक्रवारी (ता. १४) दुपारी बारा वाजता ती ४२ हजार ६०० रुपयांवर आली. एकाच दिवसात बाराशे रुपयांनी सोन्याच्या किमती उतरल्या आहेत. खरेदीदारांसाठी ही सुवर्णसंधी आहे; मात्र आठवडाभरापासून खरेदीदारांनी पाठ फिरवल्याचे सराफा विक्रेत्यांनी सांगितले. 

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

सोन्याच्या किमती झपाट्याने वाढत असल्याने सोने पन्नास हजाराच्या घरात जाणार असे बोलले जात होते; मात्र जगभरात कोरोनाने घातलेली धुमाकूळमुळे जागतिक परिणाम सर्वच देशांत जाणवत आहेत. शेअर बाजारातील घसरण आणि सोन्याच्या किमतीत झालेली घट ही गुंतवणूकदारांसाठी संधी असल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले. ग्राहकांसाठी सोने खरेदीची ही योग्य वेळ असल्याचे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी सांगितले. 

चांदी दोन हजारांनी स्वस्त 

चांदीच्या किमतीतही मोठ्या प्रमाणावर चढउतार होताना दिसत आहे. गुरुवारी चांदी ५६ हजार ५०० रुपये किलो होती. शुक्रवारी ५४ हजार २०० रुपये किलोने विक्री झाली.

loading image