esakal | Coronavirus : प्रादुर्भाव वाढतोय, पण आली एक दिलासादायक बातमी, वाचा...
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Virus Patient Negative

राज्यात सध्या १३५ बाधित रुग्ण आहेत. आतपर्यंत ४,२२८ जणांच्या कोरोनासाठी चाचण्या केल्या. त्यापैकी ४,०१७ चाचण्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.

Coronavirus : प्रादुर्भाव वाढतोय, पण आली एक दिलासादायक बातमी, वाचा...

sakal_logo
By
विकास देशमुख

औरंगाबाद - जगात कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. भारतातही रोज बाधितांची संख्या वाढत आहे. असे असले तरी योग्य उपचाराने काही जण बरेही झाले आहेत. ही जगासाठी दिलासादायक बातमी आहे. बरे होणारांची संख्या लाखावर गेली आहे. त्यावर eSakal.com ने टाकलेला प्रकाश.
 

इतके रुग्ण झाले बरे

जगात आजपर्यंत (ता. २७ मार्च) एकूण ५ लाख ३७ हजार ११३ जणांना कोरोनाचा संसर्ग होऊन कोवीड-१९ ची बाधा झाली. त्यापैकी १ लाख २४ हजार ४३९ रुग्ण बरे झाले; तर २४ हजार १२६ लोकांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केली.

 
चीनपेक्षाही अमेरिकेत परिस्थिती धोकादायक

अमेरिकेमध्ये २७ मार्चपर्यंत ८५ हजार ६१२ जणांना कोवीड-१९ ची लागण झाली तर चीनमध्ये सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, ८१ हजार ३४० जण बाधित आहे. चीनमध्ये आज (ता. २७ मार्च) ५५ नवे रुग्ण आढळले; तर अमेरिकेत हीच संख्या १७७ आहे. 
 


भारतातील परिस्थिती आहे अशी

भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढतच आहे. सध्या देशात ७५३ जण कोवीड-१९ चे रुग्ण आहेत. त्यापैकी ६७ जण बरे झाले तर १८ जणांचा मृत्यू झाला. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण केरळ आणि त्या पाठोपाठ महाराष्ट्रात आहेत. कालच्या तुलनेत देशभरात आज १८ नवीन रुग्णांची भर पडली आहे. महाराष्ट्रातील १३५ रुग्णांपैकी १५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज (ता. २७ मार्च) राज्यात नवे राज्य रुग्ण आढळले तर चार रुग्णांचा मृत्यू झाला.

संबंधित बातमी - Coronavirus : बालकांना कोरोना होतो का, चीनमध्ये काय झाले? डॉक्टर म्हणतात...


आरोग्य मंत्री राजेश टोपे आज म्हणाले

  • राज्यात सध्या १३५ बाधित रुग्ण आहेत. आतपर्यंत ४,२२८ जणांच्या कोरोनासाठी चाचण्या केल्या. त्यापैकी ४,०१७ चाचण्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. १३५ पॉझिटिव्ह आले. 
  • शासकीय आरोग्य सेवेतील डॉक्टर्स, कर्मावारी वर्ग तसेच अन्य आपातकालीन सेवेतील कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. सेवा देत आहेत. त्यांचे अभिनंदन. अशी सेवा देणाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता देण्याबाबत राज्य शासन विचार करीत आहे. 
  • कोरोना व्यतिरिक्तही अन्य आजारांच्या उपचारांसाठी खासगी रुग्णालये सुरू राहणे आवश्यक आहे. गरोदर महिला, लहान मुलांचे आजार, हृदयविकाराचे रुग्ण यांना वेळीच उपचाराची गरज असते. त्यामुळे राज्यभरातील खासगी डॉक्टरांनी दवाखाने सुरू ठेवावेत. कोरोनाच्या भीतीपोटी दवाखाने बंद ठेवू नका. संचारबंदीच्या काळातही पोलिस आवश्यक ते सहकार्य करतील.
  • राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्ताची साठवणूक दीर्घकाळ करता येत नाही. केवळ कोरोनाच्या रुग्णांसाठी नव्हे तर अनेक वैद्यकीय उपचारांमध्ये , हिमोफेलियाच्या रुग्णांसाठी रक्ताची गरज असते. अशावेळी सामाजिक संस्थांनी संचारबंदी काळातील सूचनांचे पालन करून रक्तदान शिबिरे घ्यावीत. जिल्हा प्रशासनाने त्यांना सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रक्तदान शिबिरे घेताना सोशल डिस्टसिंग पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
  • ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे आणि उपचाराचे व्यवस्थापन योग्य प्रकारे केले जात आहे असे कोरोनाबधित रुग्ण बरे होत आहेत. 
  • बाधित रुग्णांपासून जवळच्या व्यक्तींना संसर्ग होण्याचा धोका लक्षात घेऊन राज्य शासन सध्या अशा व्यक्तींचे ट्रेसिंग नंतर त्यांची टेस्टिंग आणि ट्रीटमेंट म्हणजेच शोध, तपासणी आणि उपचार या त्रिसूत्रीप्रमाणे काम करण्यात येत आहे.
  • नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगचा नियम मोडू नये. सर्वपक्षीय कार्यकर्ते, सामाजिक संघटना, मंडळांच्या कार्यकर्त्यांनी हातात हात घालून गरजूंना घरपोच सेवा देण्यासाठी पुढाकार घ्यावा.