फर्दापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात भारतातील कापसाला मागणी नसल्याने भाव गडगडले आहेत. कापसाला चांगला भाव मिळेल, या आशेवर शेतकरी आहेत. मात्र, व्यापारी हमीभावापेक्षा कमी बोली लावत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत..फर्दापूर, वरखेडी खुर्द, ठाणा, घनवट, जामठी, रवळा, जवळा आदी ग्रामीण क्षेत्रात कपाशीचे मुख्य पीक घेतले जाते. कापसाला चांगला भाव मिळेल, अशी आशा असताना भाव कोसळत असल्याने शेतकरी चिंतातुर झालेत, तर कापूस दराचे सरकारी धोरण उत्पादक व व्यापारी यांच्यासाठी उपयुक्त असायला हवे. मात्र, सध्या उलट चालले आहे. त्यामुळे आमचाही नाईलाज आहे, असे कापूस व्यापाऱ्यांनी सांगितले..तीन जिल्ह्यांतील १५० पैकी ८० जिनिंग-प्रेसिंग बंददरवर्षी दिवाळीपासून कापसाचा हंगाम सुरू होतो. डिसेंबरपर्यंत जिनिंग-प्रेसिंग कारखाने सुमारे दोन ते अडीच लाख गाठींची खरेदी करतात. पण, यंदा तशी परिस्थिती नाही. जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांतील दीडशेपैकी ८० जिनिंग-प्रेसिंग बंद आहेत. ज्या सुरू आहेत, त्याही पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. बांगलादेश, व्हिएतनाम, चीन हे देश प्रामुख्याने भारताचा कापूस खरेदी करतात. पंरतु, त्यांच्याकडूनही हवी तशी मागणी होत नाही म्हणून कापसाची निर्यात ठप्प आहे..‘सीसीआय’च्या जाचक अटींमुळे शेतकरी नाराजबांगलादेशात राजकीय अराजकता माजली आहे. त्याचा व्यापारावर परिणाम झालाय. शिवाय भारताच्या अनेक व्यापाऱ्यांचे सौदेही अडकले आहेत. कापूस आयात करून जिनिंग चालवायच्या, तर भरमसाठ इम्पोर्ट ड्युटीमुळे तेही शक्य नाही. अशा परिस्थितीत कापूस मार्केटमध्ये मंदी आहे. शिवाय, उत्पादन खर्च वाढल्यामुळे कापसाला किमान १० ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. आज सीसीआय साडेसात हजार रुपयांचा भाव देते. पंरतु, जाचक अटींमुळे शेतकरी तिकडे जायला तयार नाहीत. परिणामी कापूस विक्रीला न काढता शेतकरी घरातच साठवून ठेवत आहेत..केवळ ६ ते ७ हजार रुपये दराने खरेदीकेंद्र सरकारने २०२४-२५ या वर्षासाठी कपाशीच्या हमीभावात ५०९ रुपयांची वाढ केली. त्यानुसार ‘सीसीआय’ने चालू हंगामात मध्यम धाग्याच्या कापसासाठी ७ हजार १२१ रुपये आणि लांब धाग्याच्या कापसाला ७ हजार ५२१ रुपये हमीभाव जाहीर केला. पण, व्यापारी हमीभावापेक्षा कमी बोली लावत असल्याने शेतकरी रडकुंडीला आला आहे..Crime News : वडिलाचा खून केल्याची मुलाकडून कबुली.सन २०१३ मध्ये कापसाला प्रतिक्विंटल सात हजार ५०० रुपये दर मिळत होता. आताही केवळ ६ ते ७ हजार रुपये प्रतिक्विंटल या दराने कापूस खरेदी केला जात आहे.कापूस वेचणीसाठी प्रतिकिलो १० रुपये मोबदला देऊनही मजूर मिळेनात. त्यामुळे कापूस शेतातच आहे. वेचनी करून विकण्यास विलंब झाल्यास व्यापारी अल्प दर देऊन बोळवण करतात.- शैलेश मोरे, शेतकरीशासनाने हमीभाव जाहीर केले. मात्र, कापसाचे हमीभाव दरवर्षी कागदावरच राहतात. अन्य वस्तूंचे दर वाढत असताना शेतमालाचे दर पाडले जाताहेत. हा प्रकार नेहमीच शेतकऱ्यांसोबत घडतो.- योगेश महाकाळ, तालुकाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, दिव्यांग विभाग, सोयगाव.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.