esakal | वैजापुरात अधिकाऱ्याला पती-पत्नीची मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

वैजापुरात अधिकाऱ्याला पती-पत्नीची मारहाण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वैजापूर (औरंगाबाद): येथील पंचायत समितीच्या एका अधिकाऱ्याला खुलताबाद येथील पती- पत्नीने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (ता. ११) घडली. अधिकाऱ्याने आरडाओरड करताच इतर कर्मचाऱ्यांनी पती, पत्नीच्या तावडीतून त्यांची सुटका केली.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अधिकारी शुक्रवारी दुपारी केबिनमध्ये पंचायत समिती सदस्यासोबत बसले होते. यावेळी खुलताबाद येथील एका दाम्पत्याने त्यांच्या केबिनमध्ये जाऊन शिपाई व पंचायत समिती सदस्याला आमचे महत्त्वाचे काम असल्याचे सांगून बाहेर जाण्यास विनंती केली. यानंतर दोघेही बाहेर जाताच सदरील दाम्पत्याने केबिनचा आतून दरवाजा बंद करून अधिकाऱ्याला स्क्रूड्रायव्हर व कटरने मारहाण करण्यास सुरवात केली. अधिकाऱ्याने आरडा- ओरड करताच इतर कर्मचारी त्यांच्या मदतीला धावले. केबिनचा दरवाजा तोडून अधिकाऱ्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा: तब्बल बारा वर्षांनंतर औरंगाबाद विमानतळाला पाणी मिळालं

या घटनेची तालुक्यात उलट- सुलट चर्चा सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली नव्हती. पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत म्हणाले, घटनेनंतर वैजापूर पोलिसांनी सदरील पती, पत्नी व अधिकाऱ्याला ठाण्यात आणून चौकशी करत मेडिकल तपासणीसाठी पाठवले. अद्याप दोन्हीकडून तक्रार देण्यासाठी कोणीही पुढे आले नाही.