
छत्रपती संभाजीनगर : परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत मृत्युप्रकरणी संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांच्या विरोधात आठ दिवसांमध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. संजय देशमुख यांनी पोलिस अधीक्षकांना दिले. याप्रकरणी पोलिस उपअधीक्षांनी तपास करावा, असेही खंडपीठाने आदेशात म्हटले आहे.