औरंगाबाद जिल्ह्यात ६७१ कोरोनाबाधितांवर उपचार, नवे १२६ रूग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

3Corona_102

औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी (ता.११) दिवसभरात १२६ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली.

औरंगाबाद जिल्ह्यात ६७१ कोरोनाबाधितांवर उपचार, नवे १२६ रूग्ण

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी (ता.११) दिवसभरात १२६ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. बरे झालेल्या १२७ जणांना सुटी देण्यात आली. रुग्णसंख्या ४१ हजार ३३८ झाली आहे. ३९ हजार ५५८ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ६७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत एक हजार १०९ जणांचा मृत्यू झाला आहे, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

हजेरी न लावल्याने सिल्लोडचे एसटी कर्मचारी संतापले, आगारप्रमुखांच्या दालनासमोर दिला ठिय्या

शहरातील बाधित
परिसर (कंसात रुग्णसंख्या) ः पडेगाव (३), देवानगरी (१), एन सहा सिडको (१), हर्सूल (२), जाधववाडी (१), भगतसिंगनगर (३), मल्हार चौक, गारखेडा परिसर (१), मंजूरपुरा, लोटाकारंजा (२), न्यू बालाजीनगर (१), हुसेननगर (१), टिळकनगर (१), सौजन्यनगर (१), सावित्रीनगर (१), साईनगर (१), रायगडनगर (१), शिवेश्वर कॉलनी (१), टेलिकॉम सो. (१), पारिजात सो. बजाजनगर (१), साई परिसर (१), एसआरपीएफ कॅंप परिसर (१४), कांचनवाडी (१), नाथ पोदार सो. (२), घाटी परिसर (३), ज्योतीनगर (१), भानुदासनगर (१), देशमुखनगर (१), बळीराम शाळा परिसर (१), भक्ती कन्स्ट्रक्शन (१), केंब्रिज शाळा परिसर (१), राजनगर (१), केशरसिंगपुरा (२), कासलीवाल तारांगण (१), बीड बायपास (१), इटखेडा (१), एन सात सिडको (१), नारळीबाग परिसर (१), एन वन (२), न्यू नंदनवन कॉलनी (१), जाधववाडी (१), व्यंकटेशनगर (१), एसबीएच कॉलनी (१), अन्य (४१).

ग्रामीण भागातील बाधित
शिवाजीनगर (१), बजाजनगर (३), बजाजनगर (१), वैजापूर (१), गंगापूर (२), फुलंब्री (१), कन्नड (१), अन्य (१०).

Edited - Ganesh Pitekar

loading image
go to top