esakal | हजेरी न लावल्याने सिल्लोडचे एसटी कर्मचारी संतापले, आगारप्रमुखांच्या दालनासमोर दिला ठिय्या
sakal

बोलून बातमी शोधा

sachin chobe.jpg

लॉकडाऊन काळातील हजेरी मिळण्यासाठी सिल्लोड येथील आगारात बुधवार (ता.11) रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी घोषणा देत ठिय्या आंदोलन केले. 
सिल्लोड आगारप्रमुखांच्या भूमिकेमुळे येथील दोनशेच्यावर कर्मचाऱ्यांना लॉकडाऊन काळातील हजेरीतुन वगळण्यात येऊन त्यांची बिनपगारी रजा टाकल्याचा आरोप करीत कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे ऐन दिवाळी सणाच्या काळात आगार परिसर दणानून गेला.

हजेरी न लावल्याने सिल्लोडचे एसटी कर्मचारी संतापले, आगारप्रमुखांच्या दालनासमोर दिला ठिय्या

sakal_logo
By
सचिन चोबे

सिल्लोड (औरंगाबाद) : लॉकडाऊन काळातील हजेरी मिळण्यासाठी सिल्लोड येथील आगारात बुधवार (ता.11) रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी घोषणा देत ठिय्या आंदोलन केले. 
सिल्लोड आगारप्रमुखांच्या भूमिकेमुळे येथील दोनशेच्यावर कर्मचाऱ्यांना लॉकडाऊन काळातील हजेरीतुन वगळण्यात येऊन त्यांची बिनपगारी रजा टाकल्याचा आरोप करीत कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे ऐन दिवाळी सणाच्या काळात आगार परिसर दणानून गेला.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

एसटी कर्मचाऱ्यांचा दिवाळी सण अंधारात जाणार का असा प्रश्न उपस्थित करीत कर्मचाऱ्यांनी आगार प्रशासनास धारेवर धरले. या प्रकरणी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली. यासंबंधी विभागीय नियंत्रकांना निवेदन देण्यात आले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विषाणू लालपरीची चाके ठप्प होती. त्यात ऑगस्ट महिन्यापासून तीन महिन्याचे वेतन थकले आहे. लॉकडाऊन काळातील हजेरी देखील नियमाप्रमाणे देण्यात आली नसल्याने कर्मचारी संतापले होते. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

याप्रश्नी त्यांनी गेल्या महिन्यात रीतसर निवेदन देऊन हजेरीसह वेतन मिळण्याची मागणी केली होती. परंतु त्यांच्या मागणीचा विचार झाला नाही. सिल्लोड वगळता जिल्ह्यातील सर्व आगारात कर्मचाऱ्यांना लॉकडाऊन काळातील हजेरी देण्यात आली. त्यामुळे संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यानंतर आगारप्रमुख प्रवीण भोंडवे यांनी त्यांना योग्य ती कारवाई करून लॉकडाऊन काळातील हजेरी देण्याचे लेखी दिल्यावर कर्मचाऱ्यांनी आंदोलन स्थगित केले. यावेळी महाराष्ट्र राज्य कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष बाबासाहेब सोळुंके, सिल्लोड आगाराचे अध्यक्ष संदीप इंगळे, सचिव कडूबा गावंडे यांचेसह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)