esakal | औरंगाबादमध्ये १८ वर्षांच्या पुढील नागरिकांचे लसीकरण सुरू होणार?
sakal

बोलून बातमी शोधा

covid 19

औरंगाबादमध्ये १८ वर्षांच्या पुढील नागरिकांचे लसीकरण सुरू होणार?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: कोरोनाला संसर्ग कमी करण्यासाठी लसीकरण हाच पर्याय असला तरी नागरिकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांसासाठी २१ जूनपासून लसीकरण सुरू करण्याच्‍या हालचाली शासनस्तरावर सुरू आहेत. पण यासंदर्भात महापालिकेला आदेश प्राप्त झालेले नाही. दरम्यान महापालिकेतर्फे आत्तापर्यंत तीन लाख ३५ हजार नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला असल्याचे महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी बुधवारी (ता. १६) सांगितले.

कोरोना संसर्गाची दुसरी लाट रोखण्यासाठी महापालिकेने शहरात ११५ केंद्र सुरू केले होते. काही दिवस याठिकाणी एका दिवसात १० हजार एवढे लसीकरण करण्यात आले. पण लसींचा साठा कमी असल्याने व शासनाकडून वारंवार नियमात बदल केले जात असल्याने नागरिकांची प्रतिसाद कमी होत आहे.

हेही वाचा: अनलॉकनंतर दौलताबाद किल्ल्यावर पर्यटकांचा अल्प प्रतिसाद

यासंदर्भात विचारणा केली असता, श्री. पांडेय म्हणाले, लस घेणाऱ्यांची संख्या वाढावी यासाठी दिव्यांग व्यक्ती, ज्यांच्याकडे ओळखपत्र नाही, तसेच ‘ड्राईव इन’ यासह विविध उपक्रम राबविले जात आहेत. पण नागरिकांचा प्रतिसाद नाही. शासनस्तरावर २१ पासून मोहीम राबविण्याचे नियोजन केले जात आहे, पण आदेश प्राप्त झालेले नाहीत. शासनाचे काय धोरण ठरेल, त्यानुसार लसीकरणाची सक्ती करण्याचे नियोजन केले जात आहे. ४५ वर्षीय ज्या नागरिकांनी लस घेतली नाही त्यांना दंड आकारण्याचा देखील विचार सुरु असल्याचे यापूर्वीच प्रशासकांनी जाहीर केले आहे. २१ जूननंतर लस देण्याचे नवे नियोजन करण्यात येईल, असे प्रशासकांनी सांगितले.

loading image