esakal | अनलॉकनंतर दौलताबाद किल्ल्यावर पर्यटकांचा अल्प प्रतिसाद
sakal

बोलून बातमी शोधा

daulatabad fort

अनलॉकनंतर दौलताबाद किल्ल्यावर पर्यटकांचा अल्प प्रतिसाद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दौलताबाद (औरंगाबाद): येथील ऐतिहासिक देवगिरी किल्ला पर्यटकांसाठी पर्यटनास बुधवारपासून (ता.16) खुला करण्यात आला. परंतु कोरोनाची धास्ती अद्याप पर्यटकांच्या मनात असल्याने पर्यटकांनी किल्ल्याकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. मार्च महिन्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढताच भारतीय पुरातत्व विभागाने भारतातील सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद केली होती. त्यानंतर आता तब्बल तीन महिन्यानंतर बुधवारी पर्यटकांसाठी पर्यटनस्थळे खुली करण्यात आली आहेत.

मागील वर्षी सुद्धा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्देशानूसार व प्रतिबंधात्मक उपाय योजनांतर्गत जवळपास नऊ महिने पर्यटन स्थळे बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर देवगिरीचा किल्ला डिसेंबर 2020 पासून पर्यटकांसाठी खुला करण्यात आला होता. परंतु यंदाही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते. त्यामुळे 11 मार्च पासून जिल्ह्यात कोरोना प्रादुभाव वाढल्याने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

हेही वाचा: Breaking News: जालन्यात पोलिसांकडून आरोपींवर सिनेस्टाईल फायरींग

परंतु हा किल्ला बंद झाल्याने पर्यटनस्थळावर अवलंबून असणारे गाईड, दुकानदार, फोटोग्राफर, हॉटेल चालक, फळ विक्रेते, पुस्तक विक्रते, कटलरी विक्रते यांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. तो पर्यटन स्थळे सुरू झाल्याने काही प्रमाणात का होईना आता सुटणार आहे.
नेहमी पर्यटकानी भरलेला किल्ला व परिसरात भीषण शांतता पसरली होती. तिथे आता हळूहळू वर्दळ वाढलं या आशेवर व्यावसायिकांनी आपली आस्थापना सुरू केली आहे. दौलताबाद परिसरात पावसाळ्यात विकेंड ला मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटनासाठी येत असतात.

हेही वाचा: लॉकडाउनमध्ये Dating app चा वापर वाढला, व्हिडीओ कॉलही वाढले

किल्यावर पर्यटनास येताना अति उत्साह न दाखवता कोरोना संदर्भातील शासकीय नियमाचे काटेकोर पालन करत किल्यावर पर्यटनास यावे नियमाचे उलघणं होऊ देऊ नये असे आवाहन किल्याचे संवर्धन सहाय्यक संजय रोहनकर,आर बी घाटे,सीताराम धनायत,आसाराम काळे,फकिरचंद गायकवाड यांनी केले आहे.

loading image
go to top