esakal | औरंगाबादेत आजही लसीकरण बंदच, चाळीस हजार लोकांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

corona

औरंगाबादेत आजही लसीकरण बंदच, ४० हजार लोकांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: लस आज मिळेल, उद्या मिळेल या आशेवर असलेल्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेतील लोकांची यादी वाढतच आहे. ही संख्या ४० हजारापर्यंत गेली आहे. आतापर्यंत शहरात ५ लाख २३ हजार नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली आहे. मात्र, यापैकी फक्त १ लाख ५५ हजार नागरिकांनी दोन डोस घेत लसीकरण पूर्ण केले आहे. उर्वरित नागरिकांना दुसरा डोस घ्यावा लागणार आहे. लसीअभावी रविवारी (ता. १८) लसीकरण झाले नाही तर आता सोमवारीही लस नसल्याने लसीकरण बंदच राहणार आहे.

शहरात कोरोनाची दुसरी लाट सुरू असताना केवळ ४५ वर्षांवरील नागरिकांचेच लसीकरण केले जात होते. दरम्यान, शासनाने १८ ते ४४ वर्षांवरील नागरिकांसाठीही लसीकरण सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळपासून आतापर्यंत शहरात कोरोना लसीकरणाला अपेक्षेपेक्षाही अधिक प्रतिसाद मिळत आहे. मात्र, त्याप्रमाणात लसींचा पुरवठा होत नसल्याने महापालिकेच्या लसीकरण मोहिमेला वारंवार ब्रेक लागत आहे. गेल्या १५ दिवसांत महापालिकेला ३५ हजार लसींचा पुरवठा झाला. त्या आठवडाभरातच संपल्या. महापालिकेने शहरातील प्रत्येक वॉर्डात एक याप्रमाणे ११५ लसीकरण केंद्र तयार ठेवले आहेत.

हेही वाचा: औरंगाबादेत लष्करी जवानाची गळफास घेऊन आत्महत्या

एका दिवसांत किमान २० हजार नागरिकांचे लसीकरण करता येईल, असे नियोजन केलेले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कधी १० हजार तर कधी ६ हजार एवढ्याच लस मिळत आहेत. मिळालेल्या लस दिवसभरात संपत आहे. लसींचा पुरवठा होत नसल्यामुळे लसीकरण मोहिमेला ब्रेक लागलेला आहे. महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर म्हणाल्या, शहरासह जिल्ह्याला लसींचा पुरवठा झालेला नाही. तो कधी मिळेल, याचीही शाश्वती देता येत नाही. सोमवारी लसीकरणासाठी लस मिळालेली नाही. त्यामुळे सोमवारी (ता.१९) लसीकरण होणार नाही.

loading image