esakal | CoronaUpdate : औरंगाबादेत नवे ९२ रुग्ण, मराठवाड्यात कोरोनामुळे सात जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

3korona_60

औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी (ता.सहा) दिवसभरात कोरोनाचे ९२ रुग्ण आढळले. रुग्णसंख्या ४३ हजार ९३२ झाली आहे.

CoronaUpdate : औरंगाबादेत नवे ९२ रुग्ण, मराठवाड्यात कोरोनामुळे सात जणांचा मृत्यू

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी (ता.सहा) दिवसभरात कोरोनाचे ९२ रुग्ण आढळले. रुग्णसंख्या ४३ हजार ९३२ झाली आहे. ९११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ४१ हजार ८६३ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

शहरातील बाधित
परिसर (कंसात रुग्णसंख्या) ः एन वन (५), पुंडलिकनगर (१), नारेगाव (१), एन सात त्रिवेणीनगर (२), हरिकृपानगर, देवळाई (१), पेठेनगर (१), ऊर्जानगर, सातारा परिसर (१), ऑडिटर सो., (१), विवेकनगर, एन दोन सिडको (१), मयूर पार्क (६), जाधववाडी (१), दिवाणदेवडी, गुलमंडी (१), छत्रपतीनगर (१), बालाजीनगर (१), अरिहंतनगर (१), मार्ड हॉस्टेल (१), रामगोपालनगर (२), रचनाकर कॉलनी (१), हर्सूल, फुलेनगर (१), एन सहा साईनगर (१), चेतनानगर (१), अन्य (३८).

ग्रामीण भागातील बाधित : स्वरूपनगर, लासूर स्टेशन गंगापूर (१), आलापूर (१), सिल्लोड (१), कन्नड (२), अन्य (१८).

कोरोनामुळे सात जणांचा मृत्यू
मराठवाड्यात कोरोनामुळे सात जणांचा मृत्यू झाला. त्यात बीडमध्ये पाच, औरंगाबादेतील दोघांचा समावेश आहे.बीड जिल्ह्यातील घटना यापूर्वीच्या असून पोर्टलवर त्यांची आज नोंद झाली. बीड जिल्ह्यातील मृतांची संख्या ५०१ झाली आहे. दरम्यान, आज या जिल्ह्यात ४६ रुग्णांची भर पडली. रुग्णसंख्या १५ हजार ९१० झाली असून १४ हजार ९३९ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ४७० जणांवर उपचार सुरू आहेत. घाटी रुग्णालयात एन-नऊ, श्रीकृष्णनगर येथील ४८ वर्षीय पुरुषाचा पाच डिसेंबरला, भिवपूर (ता. भोकरदन, जि. जालना) येथील ८० वर्षीय पुरुषाचा आज मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार १५९ वर पोचली.
 

Edited - Ganesh Pitekar