लघु उद्योगांना चालना देण्यासाठी हेल्पडेस्कची स्थापना; सीएमआयएचा युनाटेड नेशन्सशी करार

covid 19
covid 19

औरंगाबाद : येथील सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना(एमएसएमई) व्यवसायात सातत्य राखण्यासाठी सल्ला तसेच स्किल मॅचमेकींग सपोर्ट देण्यासाठी सीएमआयए व युनाटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (यूएनडीपी) यांच्याबरोबर सामंजस्य करार करण्यात आला आहे. यातूनच कोविड-१९ हेल्पडेस्कची स्थापना करण्यात आली आहे. 

या हेल्पडेस्कच्या माध्यमातून सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना केंद्र सरकारतर्फे कोव्हीड-१९ सुरक्षा नियमावली, मार्गदर्शक तत्वे, नियामक नियम, सरकारच्या कोव्हीड-१९ विषयी उपाययोजना आणि सहाय्यता याविषयी माहिती दिली जाणार आहे. या कोव्हीड-१९ मदत कक्षाद्वारे लघु उद्योजकांना कोविडच्या प्रभावानंतर शासनाने निर्देशीत केलेल्या सुरक्षा नियमांचे पालन करत उत्पादन पुन्हा सुरू करण्यासाठी तसेच उद्योगांना स्कील गॅप कसा भरून काढता येईल. याबद्दल सल्ला दिला जाईल तसेच मार्गदर्शन केले जाईल.

सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांनी तसेच महिला उद्योजकांनी त्यांच्या व्यवसायाशी उपलब्ध असलेल्या  नौकरी/अप्रेंटीसशीपच्या संधी व त्यासाठी लागणारे कौशल्य, शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि अशा प्रकारचे मनुष्यबळ या माहितीसाठी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲड ॲग्रीकल्चर, रेल्वे स्टेशन एम.आय.डी.सी. येथील कार्यालयाशी संपर्क साधावा. या विषयी अधिक माहिती लघु उद्योजकांनी cmiamarathwadaskillshub@gmail.com, cmiasecretary@gmail.com इ-मेल वर संपर्क साधावा, असे आवाहन सीएमआयएतर्फे करण्यात आले आहे. 

हेल्पडेस्क एमएसएमईंना मिळणाऱ्या सुविधा... 

- वैयक्तिक आणि फोनद्वारे एमएसएमईंना सल्ला व मार्गदर्शन दिले जाईल 
- शासकीय योजनांची माहिती दिली जाईल 
- कामाच्या ठिकाणी आरोग्य, सुरक्षा आणि सुरक्षिततेच्या मानकांची माहिती देणे. 
- पुर्ण क्षमतेनुसार उत्पादनास सुरूवात करणे, अपेक्षित कुशल कामागरांची पुर्तता करणे यांवर मार्गदर्शन. 
- तज्ञ व्यक्तींचा सल्ला आणि मार्गदर्शन 
- वित्तीय संस्था आणि सरकारी विभागांतर्फे राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती 
- बँकर्स, सरकारी अधिकारी, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ इ.यांच्याशी वेबिनारद्वारे चर्चा व मार्गदर्शन 
- सी.एम.आय.ए.(CMIA) wa यू.एन.डी.पी.(UNDP) कोव्हीड हेल्पडेस्क-१९ तर्फे लघु उद्योजकांसाठी साठी वेबीनार/ चर्चासत्र/परीसंवाद यांचे आयोजन 
- हेल्पडेस्क राज्य कौशल्य विकास अभियान आणि इतर संबंधित सरकारी विभाग, सहाय्यक संस्था यांच्या मदतीने उद्योजकांच्या मागणीच्या आधारावर कुशल कामगारंच्या आवश्यकतेप्रमाणे भरती करण्यास सहाय्य करेल. 
- व्यवसाय वृद्धींगत करण्यासाठी शासनाकडून तसेच इतर वित्तिय संस्थांनकडून उपलब्ध असलेल्या योजनाबद्दल मार्गदर्शन 
- महिला उद्योजकांसाठी त्यांचा व्यवसाय पुन्हा सूरू करण्यासाठी तसेच त्यांच्या व्यावसायात विविधता आण्याच्या दृष्टीने विशेष ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन. 
- सी.एम.आय.ए. व यू.एन.डी.पी. कोव्हीड-१९ हेल्पडेस्क ऑगस्ट-२०२० ते जानेवारी २०२१ दरम्यांन कार्यरत राहील.

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com