
औरंगाबाद : नात्यातीलच एका नराधमाने असहाय घटस्फोटित महिलेला तुझ्या मुलीसह तुझा सांभाळ करीन म्हणत लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केला. इतकेच नव्हे तर ‘ती’ गर्भवती राहिल्यानंतर मुलीला मारून टाकीन अशी धमकी देत गर्भपात करण्यास भाग पाडून पाच लाख रुपये लाटले. याप्रकरणी नात्यातील भावाविरोधात क्रांती चौक पोलिसांत २२ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. पांडुरंग ऊर्फ राहुल रामेश्वर ईप्पर (२४, रा. हिरवड, ता. लोणार, सध्या रा. नंदी वाइन शॉपमागे, भोईवाडा मिल कॉर्नर) असे आरोपीचे नाव आहे.
हा प्रकार ११ जुलै २०२१ ते २७ डिसेंबर २०२१ दरम्यान भोईवाडा आणि समर्थनगरातील हॉटेलात घडत होता. याप्रकरणी २७ वर्षीय फिर्यादीच्या तक्रारीनुसार ती आणि आरोपी राहुल हे दूरच्या नात्यातून बहीण-भाऊ लागतात. तिचा घटस्फोट झाल्याने ती खचलेली असतानाचा फायदा घेत आरोपी राहुलने फिर्यादीला ‘आयुष्यभर तुझ्या मुलीसह तुला सांभाळेन’ असे म्हणत फिर्यादीसह तिच्या आईवडिलांचा विश्वास संपादन केला.
दरम्यान फिर्यादीला पोटगीतून मिळालेले १ लाख ७५ हजार तसेच तिच्या आईचे दागिने मोडून आलेले आणि घरातील असे पाच लाख रुपये आरोपीने घेतले. त्या कालावधीत ऑक्टोबर २०२१ फिर्यादी गर्भवती राहिली, मात्र आणखी कायद्यानुसार आपले लग्न झाले नसल्याने तोपर्यंत गर्भ ठेवू नको, असे म्हणत तिला गोळ्या खाऊ घातल्या. तसेच आपल्या संबंधाबद्दल कोणाशी बोलशील तर तुझ्या मुलीला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देत लग्न करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे फिर्यादीने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक अमोल सोनवणे करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.