Aurangabad Crime News | मैत्रिणीचे डोके आपटून मित्रानेच घेतला जीव! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MURDER

औरंगाबाद : मैत्रिणीचे डोके आपटून मित्रानेच घेतला जीव!

औरंगाबाद : दवाखान्यात दाखल मुकुंदवाडीतील जखमी महिलेचा उपचारानंतर मृत्यू झाला. सदर महिलेची ओळख पटवून पोलिसांनी महिनाभरानंतर खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या प्रकरणी संबंधित महिलेच्या मित्रानेच जमिनीवर डोके आपटून तिचा खून केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अजमतखान उर्फ कयामत अनिसखान (वय २७, रा. शहाबाजार चंपाचौक) या आरोपी मित्राला पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी सांगितले, की २ फेब्रुवारी २०२२ रोजी एका जखमी महिलेला रूग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचारादरम्यान या महिलेचा ६ फेब्रुवारीरोजी मृत्यु झाला. सदर महिलेच्या डोक्यावर मार लागल्याने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आले होते. दरम्यान, या प्रकरणाची नोंद करून मुकुंदवाडी पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी सदर महिलेची खरी ओळख पटविली. सदर महिला ही तिचा मित्र अजमत खान ऊर्फ कयामत याच्यासोबत चार ते पाच महिन्यांपासून मुकुंदवाडी भागात राहत होती.

पोलिसांनी विविध माध्यमातून २ फेब्रुवारीसोबत सदर महिलेसोबत काय घडले याची माहिती घेण्यास सुरवात केली. काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार अजमत उर्फ कयामत खान याने तिला मारहाण केल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी माग काढत अजमत उर्फ कयामत खान याला अटक केली. या खुनाच्या प्रकरणात अजमतला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे

नेमके काय, कसे घडले?

या घटनेसंदर्भात पोलिसांनी सांगितले की, अजमत खानने २ फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान या महिलेला उचलून त्या भागातील एका मैदानातील चिंचेच्या झाडाजवळ नेले होते. अजमत खान तिला मारहाण करत होता. या मारहाणीतच सदर महिलेचे डोके जमिनीवर आपटले. उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाला.

पैशावरुन वाद झाल्याचा संशय

सदर प्रकरणातील मृत महिला आणि मारेकरी अजमत खान हे दोघे मुकुंदवाडी परिसरात चार ते पाच महिन्यांपासून राहत होते. हे दोघेही मद्यपान करत असत, शिवाय पैशांवरून या दोघांचे भांडण होत होते. त्या रात्रीही पैशावरूनच वाद झाला असावा अशी माहितीही तपासादरम्यान समोर आल्याचेही पोलिसांनी सांगितले.

Web Title: Crime News Aurangabad Friend Murder Woman Friend

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top