Crime news : बाळाची विक्री करण्याचा घाट हाणून पाडला

अनाथालय चालविणारे दांपत्य ताब्यात
दामिनी, भरोसा सेल
दामिनी, भरोसा सेलsakal

छत्रपती संभाजीनगर : अडीच महिन्यांच्या चिमुकल्याला विक्री करण्याचा प्रयत्न दामिनी, भरोसा सेल, जवाहरनगर पोलिसांनी हाणून पाडला. ही घटना २० जूनरोजी शिवशंकर कॉलनीतील जिजामाता बालकाश्रमात (अनाथालय) घडली.

विशेष म्हणजे, पाच लाखांचा सौदा होऊन बाळ विक्री होण्याच्या वेळेतच पोलिस तिथे पोचले. याप्रकरणी आश्रमचालक दांपत्यासह बाळाला ठेवून गेलेली महिला आणि तिला मदत करणारा तिचा भाऊ अशा चौघांविरोधात जवाहरनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दिलीप श्रीहरी राऊत (वय ५३) आणि त्याची पत्नी सविता राऊत (४५, रा. दोघेही एच ८, तानाजी चौक, शिवशंकर कॉलनी) अशी दोघांची नावे आहेत.

दामिनी, भरोसा सेल
Sangli Crime : उसन्या पैशांचे कारण ठरले जीवघेणे; भाजीविक्रेत्याला भोसकले

याप्रकरणी दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक अनिता फासाटे यांनी जवाहरनगर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार भरोसा सेलच्या पोलिस निरीक्षक आम्रपाली तायडे यांना शिवशंकर कॉलनीतील जिजामाता बालक आश्रम (अनाथालय) येथे एका बाळाची विक्री होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून निरीक्षक तायडे यांनी दामिनी पथकाच्या श्रीमती फासाटे, भरोसा सेलच्या उपनिरीक्षक ज्योती गात यांच्या पथकाला जवाहरनगर पोलिसांच्या मदतीने घटनास्थळी पाठविले.

महिला म्हणते तीन महिन्यांपूर्वी नवरा वारला, पण प्रत्यक्षात मात्र.....

दरम्यान आश्रमामध्ये पैठण तालुक्यातील दाभूळ येथील एका महिलेचा अर्ज पोलिसांच्या हाती लागला. तिने सदर बाळ हे तिचेच असल्याचा दावा केला. तिला ९, ६ आणि ४ वर्षांची तीन मुले आहेत. दरम्यान, हे चौथे बाळ जन्मले.

दामिनी, भरोसा सेल
Jalgaon Crime News : अवैध वाळू वाहतूकप्रकरणी पथकाकडून 4 ट्रॅक्टर जप्त

तीन महिन्यांपूर्वीच तिच्या पतीचे निधन झाले, असे तिने सांगितले. तसेच, पतीच्या मृत्यूचा दाखलाही सोबत जोडलेला आहे. या बाळाचा सांभाळ करण्यास ती महिला सक्षम नसल्यामुळे तिने भावाला सांगून हे बाळ या संस्थेत ठेवले. चौकशीअंती तिच्या पतीचे निधन तीन महिन्यांपूर्वी नव्हे तर नोव्हेंबर २०२१ मध्ये झाल्याचे समोर आले. त्यामुळे हे बाळ अनैतिक संबंधातून जन्मले असावे किंवा त्यांनी हे बाळ चोरी करून तेथे ठेवले असावे, असा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. ही महिला बुधवारी पोलिसांसमोर हजर होणार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक निरीक्षक दिलीप चंदन करीत आहेत.

बालकाश्रम चालकाची चाल

या बालकाश्रमात बालकल्याण समितीच्या आदेशाने ६ ते १८ वर्षे वयाची मुले ठेवता येतात. त्यांना ० ते ६ वर्षे वयाची मुले सांभाळण्याचा कायदेशीर अधिकार नाही. तरीही त्यांनी हे बाळ ठेवून घेतले. तेच बाळ एका दांपत्याला दत्तक देत असल्याचे बनावट कागदपत्र तयार केले. मुळात दत्तक प्रक्रिया ही केंद्र सरकारच्या विशिष्ट पोर्टलवरून चालते. तरीही यांनी परस्पर पाच लाख रुपयांत हे बाळ एका दांपत्याला देण्याचा घाट घातला होता,

अशी खळबळजनक माहिती समोर आली. ही कारवाई जवाहरनगर ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, निरीक्षक आम्रपाली तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दिलीप चंदन, दामिनी उपनिरीक्षक अनिता फासाटे, भरोसा सेलच्या उपनिरीक्षक ज्योती गात, अंमलदार संजय गायकवाड, शोन पवार, राजेश चव्हाण, बाळासाहेब बैरागी, ज्ञानेश्वर शेलार यांनी केली.

पाच लाखांत ठरला होता सौदा

दामिनीसह पोलिसांनी आश्रमात धाव घेत झडती घेतली असता, एका झोळीत बाळ झोपलेले दिसले. याबद्दल पोलिसांनी बालआश्रमाचे राऊत दांपत्याकडे चौकशी केली असता, सविता राऊत ही त्याची काळजी घेताना दिसून आली. दरम्यान चौकशीअंती बाळाला पाच लाख रुपयांत विक्री करण्याचा घाट घालण्यात आल्याचे समोर आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com