esakal | राखी बांधल्याने त्याच्यासोबत गेली... पण त्याच्या मनातच होते काळंबेरं
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad crime

पीडितेवर अत्याचार केल्यानंतर आरोपीने कोणाला सांगू नकोस अन्यथा चित्रीकरण केले असून ते व्हायरल करेन अशी धमकी दिली

राखी बांधल्याने त्याच्यासोबत गेली... पण त्याच्या मनातच होते काळंबेरं

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद: आधीच आईवडिलांचे छत्र हरविलेल्या १५ वर्षीय बहिणीला भाऊ मिळाला खरा, मात्र राखी बांधून घेतल्यानंतर त्याच भावाने व्यायाम करण्याच्या बहाण्याने फिरायला नेत मधूनच रस्ता बदलून खोलीवर घेऊन गेला आणि अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी दोन दिवसांनंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रामदास रामजी प्रसाद ऊर्फ पल्ला दादा (२५) असे त्या आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणी सविस्तर माहिती अशी की, पीडिता आणि दोघी बहिणी शहरात राहतात. पीडितेची मोठी बहीण ही आरोग्य क्षेत्रात नोकरी करते. मुलींच्या आईचे ११ वर्षांपूर्वी निधन झाले, तर वडिलांचे ४ वर्षांपूर्वी निधन झाले आहे. दोघी बहिणींचा मानलेला भाऊ आरोपी प्रसाद याने त्यांच्या घरी जाऊन २४ ऑगस्ट रोजी त्याने पीडितेकडून राखी बांधून घेतली. दरम्यान पीडितेला तू मोठी झालीय माझ्यासोबत व्यायाम करायला ये, चल म्हणत तिच्या बहिणीला बोलून तिला घेऊन निघाला. मात्र मैदानावर जाण्याचा रस्ता बदलत त्याने मित्राच्या कारने बायपासला रेल्वे पटरीच्या पलीकडे असलेल्या त्याच्या खोलीवर गेले. तिथे तिला व्यायाम करायला लावला आणि मालीश करतो म्हणत तिच्यावर अत्याचार केला.

हेही वाचा: औरंगाबादेत डॉक्टरने काढली महिला रुग्णाची छेड

चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी-
पीडितेवर अत्याचार केल्यानंतर आरोपीने कोणाला सांगू नकोस अन्यथा चित्रीकरण केले असून ते व्हायरल करेन अशी धमकी दिली. पिडितेने घडल्या प्रकार कोणाला सांगितला नाही, मात्र दोन दिवसांनी त्रास होऊ लागल्यानंतर मोठ्या बहिणीने दवाखान्यात नेल्यानंतर प्रकार समोर आला. डॉक्टरांनी पोलिसांत जाण्याचा सल्ला दिल्यानंतर समाजसेविका सुकन्या भोसले यांनी पीडितेला धीर देत पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली.

हेही वाचा: राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा : चित्रा वाघ

आरोपी मुंबईतून तडीपार-
आरोपी प्रसाद याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्याला मुंबईहून तडीपार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणीही तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी पल्ल्या दादा याला न्यायालयाने ७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

loading image
go to top