Crime News : बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी दीड वर्षानंतर बाळासह सापडली, आधार देणाऱ्यानेच...

अनाथ अल्पवयीन मुलीला `आधार` देऊन केला अत्याचार
CRIME
CRIMESAKAL

छत्रपती संभाजीनगर : वडील देवाघरी गेले तेव्हा ‘ती’चे वय होते अवघे १२ वर्षे. दोन वर्षांनंतर आईही आजारपणात गेली. त्यानंतर आजीकडे राहत असलेल्या ‘ती’ला मात्र आजीकडून रोज मारहाण होत असे. या मारहाणीला कंटाळून तिने घर सोडले खरे, मात्र ती शहराबाहेर गेली नाही तर शहरातच गजरे विकू लागली.

दरम्यान, एका ४० वर्षीय व्यक्तीची तिच्यावर ‘नजर’ पडली. त्याने तिला भावनिक आधार दिला, मुळात तिला आधाराची गरज होतीच; पण वडिलांच्या वयाच्या ‘त्या’ची नजर तिला समजली नाही. त्याने अल्पवयीन मुलीवर अनेकदा अत्याचार केले, त्यातून सध्याही अल्पवयीन असलेल्या ‘ती’ला बाळ झाले.

इतकेच नव्हे, तर आधीच्या दोन पत्नी असलेला ‘तो’ ‘ती’ला बाळंत झाल्यानंतर पत्नीसारखी वागणूक देऊ लागला. अखेर शहर पोलिस दलाच्या अनैतिक मानवी वाहतूक कक्षाच्या पथकाने (एएचटीयू) सप्टेंबर २०२१ मध्ये बेपत्ता झालेल्या या १६ वर्षाच्या मुलीला आता शोधले असून ४० वर्षांच्या ‘त्या’लाही अटक केली.

अन् लागला तपास

आजीने नात बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली मात्र गुन्हा दाखल होऊनही तपास लागत नसल्याने अखेर तो गुन्हा आयुक्तालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग झाला. कक्षाचे निरीक्षक शिवाजी तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक कामाला लागले अन् मुलीचा शोध लागला खरा, मात्र हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला.

आरोपीसोबत लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेला मुलीवरील अत्याचाराचा प्रकार माहिती होऊनही ती गप्प बसली होती. तर बाळ झाल्याने अल्पवयीन मुलगीही आरोपीसोबत राहत असे. दरम्यान एएचटीयूच्या पथकाला सदर अल्पवयीन मुलगी आरोपी सुभाष याच्या घरात असल्याची गुप्त माहिती मिळाली. दरम्यान,

पोलिस आयुक्त मनोज लोहिया, उपायुक्त अपर्णा गीते यांच्या मार्गदर्शनाखाली कक्षाचे निरीक्षक शिवाजी तावरे, सहायक निरीक्षक सुषमा पवार, सहायक फौजदार इसाक पठाण, हवालदार डी. डी. खरे, हवालदार संतोष त्रिभुवन, अमृता काबलिये, अंमलदार हिरा चिंचोळकर, सायबरच्या सोनाली वडनेरे यांनी मुलीला आरोपी सुभाष राठोडसह ताब्यात घेतले. आरोपीला पुंडलिकनगर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com