TET Exam Scam : टीईटी घोटाळ्याच्या यादीत शिक्षणाधिकाऱ्यांच्या मुलीचे नाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news TET Exam Scam Education Officer  daughter name Abdul Sattar aurangabad

TET Exam Scam : टीईटी घोटाळ्याच्या यादीत शिक्षणाधिकाऱ्यांच्या मुलीचे नाव

औरंगाबाद : टीईटी घोटाळ्यात दिवसेंदिवस नवनवीन खुलासे होत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातून काही दिवसांपूर्वी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलांची नावे आली होती. त्यानंतर आता पुन्हा माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या मुलीचे नाव टीईटी यादीत आल्याने खळबळ उडाली आहे. २०१८ आणि २०१९-२०२० मध्ये झालेल्या टीईटी परीक्षेत गैरप्रकार करत अपात्र परीक्षार्थींना पात्र करण्यात आले असल्याचा ठपका सायबर पोलिसांनी दोषारोपपत्रामध्ये ठेवला. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने टीईटी परीक्षेत झालेल्या गैरप्रकारामुळे दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने गैरप्रकारात समाविष्ट उमेदवारांची संपादणूक रद्द तर केलीच, शिवाय त्यांना या परीक्षेसाठी कायमस्वरूपी बंदी घालण्याचा निर्णय घेऊन अशा एकूण ७ हजार ८७४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

या परीक्षेत राज्यभरातील ७,८७४ शिक्षकांनी पैसे देऊन पात्रता प्रमाणपत्र मिळविल्याची माहिती पुणे सायबर पोलिसांच्या तपासातून पुढे आली. अपात्र असतानाही गुणांत फेरफार करून अंतिम निकालात पात्र ठरविण्यात आल्याचा ठपका परीक्षार्थींवर ठेवण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातून काही दिवसांपूर्वी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलांची नावे टीईटी घोटाळ्याच्या यादीत आल्याने अनेक आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्यानंतर आता या यादीत औरंगाबाद माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मधुकर देशमुख यांच्या मुलीच्या नाव समोर आले आहे.

माझ्या मुलीने टीईटी परीक्षा दिली होती; पण तिने शासनाचा कोणत्याही योजनांचा लाभ घेतलेला नाही. तसेच ती कोणत्याही अनुदानित किंवा विनाअनुदानित शाळेवर कार्यरत नाही.

-एम. के. देशमुख, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग

Web Title: Crime News Tet Exam Scam Education Officer Daughter Name Abdul Sattar Aurangabad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..