esakal | 'विमान कंपन्यामुळेच रखडली विमानतळावरील कस्टमची सुविधा'
sakal

बोलून बातमी शोधा

custom service aurangabad airport

चिकलाठाणा अंतरराष्ट्रीय विमानतळावर अंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवेसाठी हालचाली झाल्या होत्या

'विमान कंपन्यामुळेच रखडली विमानतळावरील कस्टमची सुविधा'

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद: चिकलाठाणा अंतरराष्ट्रीय विमानतळावर अंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवेसाठी हालचाली झाल्या होत्या. कस्टम विभागातर्फे विमानतळावर सुविधेसाठी सर्व प्रक्रीया पार पडली आहे. मात्र विमान कंपन्यांकडून आवश्‍यक कागदपत्रांची पुर्तता न केल्यामुळे कस्टमची सुविधा रखडली आहे. आम्ही मनूष्यबळापासून ते तांत्रिकबाबी पुर्ण केल्या असल्याचे केंद्रीय जीएसटीचे सहाय्य आयुक्त अमोल केत यांनी सोमवारी (ता २७) पत्रकार परिषदेत सांगितले. 

आंतरराष्ट्रीय कस्टम दिन साजरा झाला. त्या निमित्ताने पत्रकारांशी संवाद साधला. २०१४ मध्ये औरंगाबाद विमानतळाला कस्टम विमानतळ म्हणून जाहीर करण्यात आले होते. कस्टमचा दर्जा मिळाल्यानंतर सहा वर्षे झाली तरीही ही सुविधा चिकलठाणा अंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरु झाली नाही. श्री.केत म्हणाले, सिमा शुल्क विभागातर्फे ही सेवा सुरु करण्याचा दृष्टीने सर्व गोष्टीची पुर्तता केलेली आहे. मनुष्यबळापासून ते साफ्टवेअर व अन्य तांत्रिक बाबींची पुर्ण झाल्या आहेत. केवळ विमान कंपन्यांनी कानूनी प्रक्रीया पुर्ण न केलेल्याने कस्टन सुविधा उपलब्ध होऊ शकल्या नाही.

Crime News: सहायक निबंधकांना मारहाण; गृहनिर्माण संस्थेच्या माजी अध्यक्षाला अटक

याबाबत एअर इंडिया आणि इंडिगो याकंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी बैठकही झाली आहे. या कंपन्यांनी बॉन्ड दिल्यानंतर ही सेवा तात्काळ सुरु होईल. असेही श्री. केत म्हणाले. देशात कोरोना लस देण्याचे काम करण्यात येत आहे. लसीचे विविध देशांत वितरणाचे काम सुरु आहे. यासाठी कस्टम विभागही गतीमान पध्दतीने काम करीत असल्याचे सहाय्यक आयुक्त दिपक माटा यांनी सांगितले. यावेळी प्रधान आयुक्त के. व्ही. सिंग,सहाय्यक आयुक्त दिपक माटा आणि सहाय्यक आयुक्त भारत गाडे, यांची प्रमुख उपस्थिती होती. 

(edited by- pramod sarawale)

loading image