Ambadas Danve : राजकीय गणित बदलणार? इम्तियाज-दानवे भेटीची जोरदार चर्चा
Imtiaz Jaleel : शिवसेना नेते अंबादास दानवे आणि इम्तियाज जलील यांची अचानक झालेली भेट चर्चेचा विषय ठरली आहे. शिरसाट यांच्या विरोधातील कागदपत्रे दानवे यांना देण्यात आली असून यावर विधिमंडळात आवाज उठवण्याचा दानवे यांचा इशारा आहे.
छत्रपती संभाजीनगर : एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांची गुरुवारी (ता. १२) भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.