

darsh amavasya festival significance for farmers:
Sakal
why farmers celebrate darsh amavasya: रब्बी हंगामातील समृद्ध पिकांसाठी काळ्या आईचे आभार मानणारा आणि शेतकऱ्यांच्या जीवनात अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा ‘दर्शवेळा अमावास्या’ हा सण शुक्रवारी (ता. १९) साजरा होणार आहे. या सणाची जय्यत तयारी गेल्या आठवडाभरापासून घराघरांत आणि शेत शिवारात सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतशिवार शेतकरी कुटुंबीयांच्या आणि त्यांच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीने फुलणार असल्याने शहरात आणि गावागावांत शुक्रवारी शुकशुकाट असणार आहे.