esakal | कर्ज अन् अतिवृष्टीमुळे आशा संपली, शेतमजुराने घेतले विषारी औषध |Farmer Suicide In Aurangabad
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer Suicide

कर्ज अन् अतिवृष्टीमुळे आशा संपली, शेतमजुराने घेतले विषारी औषध

sakal_logo
By
हबीबखान पठाण

पाचोड (जि.औरंगाबाद) : आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतमजुराने विविध खासगी वित्तीय संस्थांच्या कर्जाच्या ओझ्यामुळे घरात विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना पैठण तालुक्यातील कुतुबखेडा येथे सोमवारी (ता.११) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली. भरत भिमराव एडके (वय ५०) असे आत्महत्या करणाऱ्या शेतमजुराचे नाव आहे. अधिक माहिती अशी, कुतुबखेडा (ता.पैठण) (Paithan) येथील भरत एडके हे मिळेल ते कामे करून आपल्या कुटुंबाला हातभार लावत असे. त्यांनी स्वतःकडे शेतजमीन (Farmer Suicide) नसल्याने गावालगत असलेल्या शासकीय गायरान जमीन कसण्यास सुरूवात केली. परंतु यंदाच्या अतिवृष्टीच्या पावसाने वहिती केलेल्या सरकारी (Aurangabad) गायरान शेतजमिनीवरील पिकांची पूर्णतः वाट लागून पदरी नैराश्य आले. त्यांनी विविध खासगी वित्तीय संस्थाकडुन विविध कामासाठी कर्ज काढले होते.

हेही वाचा: औरंगाबादेत गळा चिरुन प्राध्यापकाचा निर्घृण खून

त्यांचा कर्ज वसुलीसाठी ससेमिरा सुरू होता. इकडे शेतीवर झालेला खर्च पदरात पडण्यापूर्वीच पिक वाया गेल्याने भरत एडके हे मानसिक तणावात राहु लागले. वित्तीयसंस्था व खासगी लोकांकडून घेतलेले पैसे कसे फेडायचे या आर्थिक विवंचनेत त्यांचे घरात कुटुंबियांसमवेत किरकोळ वाद झाले. अन् नापिकी व कर्जबाजारीमुळे पदरी आलेल्या नैराश्यातून भरत एडके यांनी सोमवारी (ता.११) घरी कोणी नसताना विषारी औषध प्राशन केले. काही वेळाने नातेवाईक घरी आल्यानंतर ही बाब नातेवाईकांच्या लक्षात आली असता त्यांनी त्यास तातडीने पाचोड येथील ग्रामीण रुणालयात उपचारार्थ दाखल केले. यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवाजी पवार यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द केले. भरत एडके यांच्या पश्चात्त पत्नी, दोन विवाहित मुली, दोन मुलगे असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पाचोड (ता.पैठण) पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असुन पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शानाखाली बिट जमादार किशोर शिंदे, फेरोज बर्डे करीत आहेत.

loading image
go to top