
औरंगाबाद : मराठवाड्यात कोरोना रुग्णसंख्येत घट होत असून रविवारी (ता. ३०) दिवसभरात १८८५ रुग्ण आढळले. शनिवारी (ता. २९) २३९५ रुग्ण समोर आले होते. औरंगाबाद-नांदेडमध्ये प्रत्येकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.औरंगाबाद जिल्ह्यात ४७४ कोरोनाबाधितांची भर पडली. त्यात महापालिका हद्दीतील ३२२ तर ग्रामीण भागातील १५२ जण आहेत. रुग्णांची संख्या एक लाख ६६ हजार २५१ वर पोचली आहे. सध्या सहा हजार ३४८ जणांवर उपचार सुरू आहेत. आणखी १ हजार १७६ रुग्ण बरे झाले.
यात महापालिका क्षेत्रातील ७१५, ग्रामीण भागातील ४६१ जणांचा समावेश आहे. आजपर्यंत एक लाख ५६ हजार २१३ रुग्ण बरे झाले आहेत. बाबरा (ता. फुलंब्री) येथील ७९ वर्षीय पुरुष, पवननगर, औरंगाबाद येथील ८० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत तीन हजार ६९० जणांचा मृत्यू झाला आहे.
जालन्यात १४७ रुग्ण
जालना जिल्ह्यात १४७ रुग्ण आढळले. रुग्णसंख्या ६६ हजार ४३३ असून ६३ हजार ५७८ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ हजार ६४७ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत १ हजार २०८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नांदेडला ३०५ बाधित
नांदेड जिल्ह्यात ३०५ रुग्ण आढळले. रुग्णसंख्या एक लाख एक हजार २८० झाली असून आणखी ४०३ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ९६ हजार ८१ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या दोन हजार ५३२ जणांवर उपचार सुरू आहेत. आणखी दोन जणांचा मृत्यू झाला. मृतांची संख्या दोन हजार ६६७ झाली आहे.
हिंगोलीत १३६, परभणीत १०२ रुग्ण
परभणी जिल्ह्यात १०२ रुग्णांची भर पडली. रुग्णसंख्या ५६ हजार ४६६ असून ५२ हजार ४४७ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या २ हजार ७१६ रुग्ण सक्रिय आहेत. आतापर्यंत एक हजार ३०३ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात १३६ रुग्ण आढळले. रुग्णसंख्या १८ हजार ९३ असून १६ हजार ८०८ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ८८६ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३९९ जणांचा मृत्यू झाला आहे.
लातुरमध्ये ३५० बाधित
लातूर जिल्हयात शनिवारी (ता. २९) कोरोनाचे ३५० रुग्ण दाखल झाले आहेत. ७५२ आरटीपीसीआर चाचण्यांतून २४९ तर ९२९ ॲन्टीजेन चाचण्यांतून १०१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. रुग्णसंख्या एक लाख तीन हजार ३१२ असून ९७ हजार ८५२ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या दोन हजार ९९६ जणांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत दोन हजार ४६१ जणांचा मृत्यू झाला आहे.
अशी रुग्णवाढ
औरंगाबाद ४७४
लातूर ३५०
नांदेड ३०५
उस्मानाबाद १९४
बीड १७७
जालना १४७
हिंगोली १३६
परभणी १०२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.