दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा | Aurangabad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार

औरंगाबाद : दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : जिल्ह्यातल्या नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने मंगळवारी (ता. २३ ) सकाळी ११ वाजता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रेल्वेस्टेशन रोडवर, देवगिरी महाविद्यालयासमोरील आयटीआय येथे हा मेळावा व मुलाखती होणार आहे. २५८ पदे भरण्यासाठी मुलाखती होणार आहेत. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने हा मेळावा घेण्यात येणार असल्याचे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त संपत चाटे सांगितले.

हेही वाचा: अहमदनगर : धनदांडग्यांसाठी होते कृषी कायदे

मेळाव्यामध्ये आयटीआय व मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, डिझाईनिंग, इंजिनियरिंग पदवी आणि पदविकाधारक पात्र उमेदवारांसाठी रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन अधिसूचित करण्यात आली आहेत. या मेळाव्यात संबंधित कंपन्यांचे नियुक्ती अधिकारी पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेऊन विविध पदांसाठीच्या रिक्त जागांसाठी निवड व भरती करणार आहेत. यासाठी ईच्छूक उमेदवारांनी वेब पोर्टलवर लॉग ईन करुन रिक्त पदांना ऑनलाईन अप्लाय करणे आवश्यक आहे.

वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्तपदांसाठी पात्रतेप्रमाणे मॅचिंग होणाऱ्या किंवा ऑनलाईन ॲप्लाय केलेल्या उपस्थित पात्र व सुयोग्य उमेदवारांच्या नियोक्त्यांकडून मुलाखती घेण्यात येणार आहे. सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा ॲडॉईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरमधून mahaswayam मोफत ॲप डाऊनलोड करून नोंदणी करावी आणि लॉगीन करुन जॉब फेअर टॅबवर क्लिक करुन Aurangabad Online Fair ४ (२०२१-२२) या मध्ये जाऊन शैक्षणिक पात्रते नुसार विविध कंपन्याच्या उपलब्ध रिक्तपदांसाठी ॲप्लाय करावे. काही अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत ०२४०-२९५४८५९ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा

loading image
go to top