
Deglur Temple Theft
Sakal
देगलूर : तालुक्यातील मौजे वझर येथील भवानी मंदिरातील दानपेटी सहित देवीच्या अंगावरील सोने चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी पळविले आहेत. ही घटना शनिवार ता. १७ च्या मध्यरात्री घडली असून दीपावलीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेने या परिसरात खळबळ उडाली आहे. चोरट्यांच्या दहशतीने या भागात भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या चोरीच्या घटनेच्या संदर्भात नांदेड वरून श्वानपथक व फिंगरप्रिंट प्रिंट अधिकाऱ्यांना पुढील तपासासाठी पाचारण करण्यात आल्याची माहिती मरखेल पोलिसांनी दिली.