Degloor Robbery : आलुर येथे धाडसी चोरी तीन लाखाचा मुद्देमाल लंपास; महिला मध्ये भीतीयुक्त वातावर
Farmer Woman Robbed : आलुर येथे एका विधवा शेतकरी महिलेच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने दोन लाख रोख व एक लाखाचे दागिने असा तीन लाखांचा ऐवज चोरून नेल्यामुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
देगलूर : तालुक्यातील मौजे आलुर येथे एका शेतकरी महिलेच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात ठेवलेले नगदी दोन लाख व एक लाखाचे दागिने लंपास केल्याची घटना शनिवारी ता.२६ रोजी रात्री घडली .त्यामुळे ग्रामीण भागात भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे.