

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: दिल्लीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषा व साहित्याच्या प्रसारासाठी ‘दिल्लीचे तख्त’ हे त्रैमासिक सुरू केले आहे. देशाच्या राजधानीत मराठी साहित्याला एक व्यापक व्यासपीठ देण्याचा प्रयत्न या तरुणांकडून केला जात आहे.