
फुलंब्री : फुलंब्री शहरात यंदा प्रथमच देवेंद्र कृषी व डेआरी एक्सपो 2025 कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 6 मार्च ते 10 मार्च या कालावधीत हे प्रदर्शन भरले जाणार आहे. या कृषी प्रदर्शनात 146 स्टॉलचे नियोजन असून 80 स्टॉलची नोंदणी पूर्ण झाली असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष सुहास शिरसाट यांनी गुरुवारी (ता.27) दिली. या कृषी प्रदर्शनाचे आयोजन आयोजन भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. पुढे बोलतांना श्री.शिरसाठ म्हणाले की, प्रत्येक जण प्रत्येक कृषी प्रदर्शनास जाऊ शकत नाही.