gajanan keche and yugandhara keche bhaktidhara event
sakal
छत्रपती संभाजीनगर - ‘सकाळ’ पुस्तक महोत्सवामध्ये अभंग आणि भक्तिगीतांच्या जुगलबंदीत ‘भक्तिधारा’ची सांगीतिक मैफल चांगलीच रंगली. कलाकारांनी बहारदार सादरीकरण करत रसिकांना विठुरायाची दर्शनवारी घडवली. महोत्सवाची सोमवारची सायंकाळ भक्तिमय झाली.
छत्रपती संभाजीनगर येथील गायक प्रा. गजानन केचे आणि त्यांची कन्या गायिका युगंधरा केचे यांनी ‘भक्तिधारा’ या कार्यक्रमातून रसिकांसाठी नव्या जुन्या भक्तिगीतांची आध्यात्मिक अनुभूती करून दिली.